पुणे

केक दुकानदारास वरवे येथे मारहाण

CD

नसरापूर, ता. १८ : ‘तुझे केकचे दुकान बंद कर,’ असे म्हणत वरवे खुर्द (ता. भोर) येथील एका दुकानदाराला लाथाबुक्क्यांनी व झाडूने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आयुष भानुदास काटे (रा. कांजळे) याच्याविरुद्ध राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुशांत संतोष शिंदे (वय २१, रा. कांजळे, ता. भोर) याने फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतचे वरवे खुर्द येथे केकचे दुकान आहे. आयुष काटे यानेही त्याच भागात केकचे दुकान सुरू केले आहे. आयुषने तीन महिन्यांपूर्वी सुशांतला ‘तुझे दुकान बंद कर,’ अशी धमकी दिली होती. मात्र, दुकान सुरूच ठेवल्याचा राग मनात धरून आयुषने सुशांतच्या दुकानात शिरून शिवीगाळ करीत मारहाण केली. यामध्ये जखमी झालेल्या सुशांतवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China-Pakistan Relation: सेकेंड स्ट्राइक क्षमतेच्या शोधात पाकिस्तान? चीनकडे अणु पाणबुड्यांची मागणी; मोठी रणनीती उघड

IPL 2026 CSK Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे १६ गुण झाले तरी...; RCB, MI च्या मदतीशिवाय प्ले ऑफ खेळणे अवघड...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारवर दबाव वाढला! वेतन आयोगासमोर कर्मचाऱ्यांच्या ‘या’ मोठ्या मागण्या

Mumbai Ahmedabad Highway Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक; ३-४ ठार, २५ हून अधिक जखमी

ST Bus Ticket Price : एसटी प्रवास महागणार? मे महिन्यानंतर खिशाला कात्री बसण्याची शक्यता; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT