पुणे

कॅनरा बँकेला ४,५०५ कोटींचा नफा

CD

कॅनरा बँकेला ४,५०५ कोटींचा नफा
मुंबई, ता. १४ ः कॅनरा बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत ४,५०५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून, मागील आर्थिक वर्षीच्या याच तिमाहीतील ५,००२ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ९.९ टक्क्यांनी घसरण झाली आहे. मार्च तिमाहीसाठीच्या तरतुदींमध्ये घट झालेली असूनही, बँकेच्या ‘इतर उत्पन्ना’मध्ये झालेल्या लक्षणीय घसरणीमुळे नफ्यात घट झाली आहे, असे बँकेने म्हटले आहे. बँकेने प्रतिशेअर ४.२ रुपये लाभांश जाहीर केला आहे.

मार्च तिमाहीसाठीच्या तरतुदी डिसेंबर तिमाहीतील २,४१४ कोटींवरून कमी होऊन ९९२ कोटी रुपयांवर आल्या आहेत. मार्च तिमाहीच्या अखेरीस बँकेचे इतर उत्पन्न ४,८२४ कोटी रुपये होते; जे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ६,३५० कोटी रुपये होते. बँकेने कमावलेल्या निव्वळ व्याज उत्पन्नामध्ये वार्षिक आधारावर चार टक्क्यांनी वाढ झाली असून, ते आधीच्या ९,४४२ कोटी रुपयांवरून ९,८०९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या तिमाहीसाठी निव्वळ व्याज मार्जिन २.५४ टक्के राहिले; जे गेल्या वर्षी २.७३ टक्के होते आणि मागील तिमाहीच्या तुलनेत ते २.४५ टक्के होते.

कॅनरा बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता मागील तिमाहीच्या तुलनेत स्थिर राहिली आहे. मार्चच्या अखेरीस एकूण अनुत्पादक मालमत्ता (एकूण एनपीए) १.८४ टक्क्यांवर आली (डिसेंबर तिमाहीत ती २.०८ टक्के होती), तर निव्वळ अनुत्पादक मालमत्ता (निव्वळ एनपीए) मागील तिमाहीच्या तुलनेत ०.४५ टक्क्यांवरून ०.४३ टक्क्यांवर आली, असेही बँकेने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT