पुणे

गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

CD

गांजा विक्रीप्रकरणी
आसलेच्या एकास अटक

भुईंज पोलिसांकडून ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त

भुईंज, ता. २२ : येथील कृष्णा नदीच्या पुलानजीक कणसेवस्तीत गांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यास भुईंज पोलिसांनी अटक केली. हणमंत किसन कणसे (रा. कणसेवस्ती- आसले, ता. वाई) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून एक किलो ८०० ग्रॅम वजनाचा ३७ हजार ८०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना कणसे हा आपल्या घराच्या पाठीमागे गांजाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पूनम झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. ताटे व पथकाने कणसेच्या घरावर छापा टाकला. यात पोलिसांनी गांजा जप्त करून कणसे यास ताब्यात घेतले.
कारवाईत पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर व वाईचे पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पूनम झगडे, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस उपनिरीक्षक सूरज शिंदे व आकाश मोरे, सहायक पोलिस फौजदार शिवाजी तोडरमल व वैभव टकले, पोलिस हवालदार नितीन जाधव व गणेश घोटकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते व आकाश कुंभार यांनी सहभाग घेतला.

-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT