पुणे

राजधानी भक्ति महोत्सव कार्यालय उदघाटन

CD

राजधानी भक्ती महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्‍घाटन

सातारा, ता. २३ ः अभयसिंहराजे भोसले प्रतिष्ठान व श्रीविठ्ठलधाम क्षेत्र आंबेघर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ डिसेंबर ते एक जानेवारी २०२७ या कालावधीत साताऱ्यात राजधानी भक्ती महोत्सव आयोजिला आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
येथील राधिका चौक येथे महोत्सव समितीच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचा उद्‍घाटन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व प्रमोद महाराज जगताप यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मंत्री भोसले बोलत होते. प्रदीर्घ कालावधीनंतर राजधानीत होणाऱ्या या महोत्सवाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री भोसले यांनी दिले. या कार्यक्रमात ख्यातनाम कीर्तनकार ज्ञानदान करणार आहेत. माउलींच्या मानाच्या अश्वांचे गोल रिंगण होणार आहे, तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरीची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती सोहळ्याचे संयोजक प्रवीण महाराज शेलार यांनी दिली. श्रीपती माने यांनी स्वागत केले. मदनराव कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ज्ञानदेव रांजणे, जयेंद्र चव्हाण, हभप बबनराव सापते, हभप संजय वेळूकर, हभप अमोल जाधव, पुरुषोत्तम कुलकर्णी, मारुती जाधव, रवींद्र लोहार, विक्रम शिंदे, सौरभ धनवडे, राहुल बाबर, मारुती निगडीकर, योगेश यादव, सुरेश पार्टे, राधेश्याम सातारकर, कृष्णा काकडे, संभाजी शेळके यांच्यासह जिल्ह्यातील कीर्तनकार, वादक, गायक आदी उपस्थित होते.
PNE26W41778
सातारा ः अभयसिंहराजे भोसले प्रतिष्ठान व श्रीविठ्ठलधाम क्षेत्र आंबेघर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या राजधानी भक्ती महोत्सवाच्या समितीच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन करताना शिवेंद्रसिंहराजे भोसले. त्यावेळी प्रमोद महाराज जगताप आदी.
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUC Fee Hike: वाहनचालकांना मोठा झटका! महाराष्ट्रात PUC तपासणीचे दर वाढले, आता किती पैसे मोजावे लागणार?

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओचा टायर अचानक फुटला

12व्या वर्षीच दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या सायरा बानो, 22 वर्षांचं अंतर असूनही केलं लग्न, 55 वर्षं जपलं नातं

Marathi News Live Updates : विडी उद्योजकांकडून महाराष्ट्र सोडूण्याचा इशारा, कारण काय?

Paithan Bus Accident: पैठणमध्ये भरधाव ट्रॅव्हल बसची ट्रकला जोरदार धडक; आठ प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT