पुणे

कदमवाकवस्तीतील अपघातप्रकरणी पीएमपीएल चालकावर गुन्हा

CD

उरुळी कांचन, ता. १२ : दोन दिवसांपूर्वी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ॲक्सिस बँकेसमोर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकी व बसचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात ज्ञानेश्वरी श्यामराव लाटे (वय २०, रा. एम.आय.टी. स्टाफ क्वार्टर, लोणी स्टेशन, ता. हवेली) ही नर्सिंगची विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली होती. याबाबत शिवराम बन्सी कराड (वय ३८, रा. एम.आय.टी. स्टाफ क्वार्टर, लोणी स्टेशन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात पीएमपीएल चालक सोमनाथ बाळासाहेब बसाटे (वय ४५, रा. महारूद्रा वास्तु कवडीपाट टोलनाका ता. हवेली) व दत्ताराम रमेश कांबळे (वय ३४ गंगानगर फुरसुंगी हडपसर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वरी लाटे ही फिर्यादी शिवराम कराड यांची भाची आहे. ज्ञानेश्वरी ही वाघोली येथील एका नर्सिंग कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. फिर्यादी हे ज्ञानेश्वरीला बस स्टॉपवर सोडवण्यासाठी दुचाकीवरून सोमवारी (ता. १०) सकाळी निघाले होते. त्यांची दुचाकी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील ऐटुझेड कलेक्शन समोर आली असता एचपीसीएल कॅन्टीन मॅनेजर दत्ताराम कांबळे यांनी फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे फिर्यादी हे रस्त्याच्या उजव्या बाजूला पडले. तर त्यांची भाची ज्ञानेश्वरी गाडीवरून उडून पीएमपीएल बसच्या चाकाच्या समोर पडल्याने पीएमपीएल बसने ज्ञानेश्वरीला दहा ते बारा फूट फरपटत नेले. या अपघातात ज्ञानेश्वरी गंभीर जखमी झाल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra GAIL Project: आता वाऱ्यापासून वीज तयार होणार! गेल महाराष्ट्रात मेगा प्रकल्प उभारणार; पवनऊर्जा विस्ताराला बूस्ट मिळणार

Ajit Pawar, DGCA Report आला समोर, आदिती तटकरे थेट बोलल्या...

T20 WC: फखरची साथ अन् फरहानने मोडला विराटचा १२ वर्षे जूना विश्वविक्रम! पाकिस्तानच्या सलामीवीरांनी श्रीलंकेला घरच्या मैदानातच रडवलं

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : बर्ड फ्लूच्या खबरदारीमुळे संजय गांधी बायोलॉजिकल पार्क तात्पुरते बंद करण्यात आले

SCROLL FOR NEXT