case registered against 2 for demanding Rs 3 crore extortion in the name of BJP Murlidhar Mohol  
पुणे

Pune News : पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने मागितली ३ कोटींची खंडणी; दोघांविरोधात गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरून २ जणांनी व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी ३ कोटी रुपये द्या म्हणून खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. दरम्यान राजेश व्यास यांनी या संदर्भात कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पुण्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने दोघांनी खंडणी मागितली या संबंधी संदीप पाटील, शेखर ताकवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप पाटील आणि शेखर ताकवणे यांनी त्यांच्या मोबाईलवर "कॉल मी" नावाचे एक ॲप डाऊनलोड करून त्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल क्रमांक सेव्ह केला. या ॲप द्वारे समोरच्या व्यक्तीला असे भासवले गेले की हा खरंच मोहोळ यांचाच नंबर आहे. तसेच आरोपींनी मोहोळ यांच्या मावसभावाचा देखील नंबरचा गैरवापर केला.

या दोघांनी या ॲपचा वापर करत पुण्यातील व्याव्यासिकला फोन करून भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमाला पैसे लागणार आहेत. यासाठी ३ कोटी रुपये द्या असे सांगून खंडणी मागितली. हा सगळा प्रकार खोटा असल्याचे लक्षात येताच त्या व्यावसायिकाने पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ मोबाईल क्रमांकावरून शोध घेत आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? कच्चा तेलाच्या किंमती १०० डॉलरच्या पार...

Pune News : दहीहंडीत नियमांचे उल्लंघन; आणखी नऊ गुन्हे दाखल; मंडळाच्या १६ पदाधिकाऱ्यांचा समावेश

Tata Punch: 'टाटा पंच' गाडीचा नवा विक्रम! 'या' कारला टाकलं मागे, देशात पहिल्या क्रमांकाची पसंती; काय आहे खास?

Marathwada Irrigation Demand: खरीप पिकांना जीवदानासाठी सिद्धेश्वर, येलदरी धरणातून तातडीने पाणी सोडा; आमदार राजू नवघरे यांची जलसंपदा मंत्र्याकडे मागणी

Dancer Aishwarya Jadhav : अश्लील नृत्याला परवानगी देऊ नका; मात्र कलेचा आदर करणाऱ्यांना परवानगी द्या

SCROLL FOR NEXT