GayatriDevi_Aundh 
पुणे

मोठी बातमी: औंध संस्थानच्या गायत्रीदेवींची फसवणूक; वकिलासह चौघांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सातारा येथील औंध संस्थानाच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनीधींची पुण्यात फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या वकिलासह चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या सदाशिव पेठेतील संपत्तीचे बनावट दस्त तयार करून ही फसवणूक करण्यात आली. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी, शशी शंकर पोडवाल (वय 51,रा. आळंदी रोड येरवडा), आसिफ जलील खान (वय 61,रा. मार्केटयार्ड), अन्वर युनूस खान पठाण (वय 54, रा. गोखलेनगर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर ऍडव्होकेट कमलेश पिसाळ (रा. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गायत्रीदेवीचे स्वीयसहायक बलराज अरुण वाडेकर (वय 37, रा. गुरुवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

बनावट कागदपत्रे तयार करून आरोपी गायत्रीदेवींची संपत्ती विकण्याचा प्रयत्न करत होते. याबाबत चौकशी केल्यानंतर फिर्यादी यांना हा प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी संपत्तीची जाऊन पाहणी केली असता, ती गायत्रीदेवींची असल्याचे समोर आले. त्यानुसार फिर्यादींनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली होती. दरम्यान दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून आरोपींना अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तसेच गायत्रीदेवी यांचे स्वीयसहायक म्हणूनही काम पाहतात. सर्व्हे, नंबर 458/1 टिळकरोड सदाशिव पेठ येथील मिळकतीबद्दल आरोपी शशी पोडवाल याने संपत्तीचा पोट भाडेकरू आसिफ आणि अन्वर यांच्याशी संगनमत करून प्रॉपर्टीचा बनावट नोटराईज समझोता करारनामा केला. त्यावर गायत्रीदेवी आणि त्यांच्या मुलाचा फोटो लावून खोट्या सह्या केल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT