पुणे, ता. २१ : लाच देऊन संरक्षण व्यवस्थेशी संबंधित कामे मिळविल्याप्रकरणी व्यावसायिक आशिष कन्सलच्या ‘सीबीआय’ कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करून आरोपीच्या स्टार्टअप कंपनीला कंत्राट दिल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, दिल्लीतील ‘अंगडिया’समवेत कन्सलची चौकशी करण्यात येणार आहे.
‘हा गुन्हा देशाच्या संरक्षण प्रणालीशी संबंधित असून, सखोल तपास आवश्यक आहे,’ असे निरीक्षण नोंदवत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पुणे न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. आर. मेंढे यांनी हा आदेश दिला. दरम्यान, ‘म्युनिशन्स इंडिया लिमिटेड’ या सार्वजनिक संरक्षण उत्पादन कंपनीचा पुण्यातील कार्यकारी संचालक अनिलकुमार बी. आर. आणि त्याचा भाऊ हर्षवर्धन बी. आर. या दोघांना २२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
सरकारी कामात खासगी कंत्राटदारांना लाभ मिळवून देण्यासाठी कोट्यवधींची लाच घेतल्याच्या आरोपावरून ‘सीबीआय’ने या तिघांना अटक केली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले. तपासादरम्यान आरोपींच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून डेटा जप्त केला असून, कन्सलने एका सरकारी अधिकाऱ्याकडून गोपनीय माहिती मिळवल्याचे समोर आले आहे. गुन्ह्याची व्यापक साखळी उघड करण्यासाठी कन्सलच्या कोठडीची मागणी ‘सीबीआय’चे निरीक्षक अविनाश गुप्ता व वकील अभयराज आरीकर यांनी केली. आरोपींचे वकील ॲड. एस. के. जैन आणि ॲड. जी. जे. भोसले यांनी बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.