Pune Traffic esakal
पुणे

Angaraki Sankashti : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! वाहतूक मार्गात बदल, 'हे' असणार पर्यायी मार्ग

पीएमपी बसेस, चारचाकी आणि जड वाहनांना शिवाजी रस्त्यावर मंगळवारी गर्दी संपेपर्यंत बंदी राहील.

सकाळ डिजिटल टीम

वाहतुकीची परिस्थिती पाहून वाहतूक वळविण्यात येणार आहे. या कालावधीत खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.

पुणे : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त (Angaraki Sankashti Chaturthi) मंगळवारी (ता. २५) शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (Dagdusheth Halwai Ganpati) येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहेत.

पीएमपी बसेस, चारचाकी आणि जड वाहनांना शिवाजी रस्त्यावर मंगळवारी गर्दी संपेपर्यंत बंदी राहील. आवश्यकतेनुसार चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर लाल महाल चौकापासून निर्बंध राहतील. वाहतुकीची परिस्थिती पाहून वाहतूक वळविण्यात येणार आहे. या कालावधीत खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.

पर्यायी मार्ग

  • -पूरम चौकातून बाजीराव रस्त्यावरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी पूरम चौकातून टिळक रस्त्याने टिळक (अलका टॉकीज) चौक आणि पुढे नामदार गोपाळकृष्ण गोखले (एफसी) रस्त्याने इच्छितस्थळी जावे.

  • -शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहन चालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक- टिळक चौकातून टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.

  • -स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.

  • -अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी बाजीराव रस्त्याने सरळ पुढे इच्छितस्थळी जावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

SCROLL FOR NEXT