Shivaji Road Pune Sakal
पुणे

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रविवारी बस व चारचाकी वाहनांसाठी बंद

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात दिवाळी सण व संकष्ट चतुर्थीमुळे होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुक कोंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रविवारी बस व चारचाकी वाहनांसाठी बंद.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहराच्या मध्यवर्ती भागात दिवाळी सण व संकष्ट चतुर्थीमुळे होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीच्या परिस्थितीनुसार रविवारी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रविवारी बस व चारचाकी वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

दिवाळी सणाच्या खरेदीसाठी रविवारी बाजारपेठेमध्ये गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर रविवारी संकष्ट चतुर्थी असल्याने मध्यवर्ती भागातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता व कुमठेकर रस्ता, महात्मा फुले मंडई येथे वाहतुक कोंडी होऊ शकते. हि वाहतुक कोंडी टाळण्यासाठी रविवारी सकाळी सात वाजल्यापासून वाहतुकीच्या परिस्थितीनुसार गर्दी संपेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन बस व चारचाकी वाहनांना वाहतुकीसाठी रस्ता बंद ठेवला जाणार आहे.

वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातुन जंगली महाराज रस्त्याने खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्त्याने पुढे जावे. तसेच महापालिकेकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी स. गो. बर्वे चौकातुन जंगली महाराज रस्त्याने झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकातुन डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतुक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

OBC Mahamorcha : ओबीसी समाजाची मोठी तयारी! १ सप्टेंबरला पाटसहून महामोर्चा

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Hockey: भारत आठव्या स्थानावर राहिल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नाराज; विश्वचषकातील कामगिरीवर दिलीप तिर्की म्हणाले, “मीही खूश नाही”

SCROLL FOR NEXT