पुणे

चिखलीच्या मोरे वस्तीत विजेचा लपंडाव चालूच

CD

चिखली, ता.२६ : मोरे वस्ती येथील राजगड पार्क परिसरातील गल्ली क्र. पाचमधील केबलमध्ये गुरुवारी (ता.२५) पुन्हा तांत्रिक बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित झाला. गेल्या महिनाभरात मोरे वस्ती परिसरात तब्बल चार वेळा भूमिगत वीज केबलमध्ये बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित झाला आहे.
मोरे वस्ती येथील अष्टविनायक चौक परिसरात १३ जून रोजी सुमारे १४ तास पुरवठा खंडित झाला. त्यानंतर त्याच ठिकाणी लगेचच दोनच दिवसांनी केबलमध्ये बिघाड होऊन १५ तास वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा राजगड पार्क येथे केबलमध्ये बिघाड होऊन १२ तासांपेक्षा अधिक काळ वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर गुरुवारी (ता.२५) पुन्हा राजगड पार्क परिसरातील गल्ली क्र. पाच येथील केबलमध्ये बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित झाला. केबलमध्ये बिघाड होण्याबरोबरच मोरे वस्ती, चिखली आदी परिसरात दररोजच अनेक वेळा विजेचा लपंडाव सुरू असतो. त्यामुळे विजेची घरगुती उपकरणांमध्ये बिघाड होऊन जळाल्याच्या घटना घडत आहेत. या परिसरात केबलमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने केवळ दुरुस्ती करण्याऐवजी संपूर्ण जुनी केबल बदलणे आवश्यक बनले आहे. मात्र, जुन्या केबल्स बदलण्याऐवजी महावितरणकडून तात्पुरती दुरुस्ती केली जात असल्याने विजेची समस्या कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कायमस्वरुपी तोडगा हवा
एकदा केबलमध्ये बिघाड झाल्यानंतर तो शोधून दुरुस्त करेपर्यंत किमान १२ ते १५ तास वीज गायब होते. त्यामुळे दुकानदार, छोटे उद्योजक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याचबरोबर नागरिकांनाही रात्र अंधारात काढावी लागते. स्वयंपाकाची घरगुती उपकरणे, पाणीपुरवठा इत्यादी दैनंदिन कामे अडून पडतात. वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यावर उपाययोजना करण्यासाठी केबल बदलून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

याबाबत माहिती घेऊन येथील वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडणे काढण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील.
- विश्वनाथ लहाने, कार्यकारी अभियंता, भोसरी विभाग, महावितरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG LNG Ships: मोठा दिलासा! 'होर्मुज'मधून 'एवढी' जहाजं भारताकडे रवाना, 26 जहाजं अजूनही आहेत रांगेत

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला प्रतिकिलो ३० रुपये बाजारभाव

PI Ranjankumar Sharma : हलगर्जीपणा करणाऱ्यांचे थेट निलंबन; गुन्हेगारांचे कंबरडं मोडणार, दृष्य पोलिसिंगवर अधिक भर

Vaccine QR Code: मोठा निर्णय! आता स्कॅन करा आणि औषधाची माहिती मिळवा; सरकारने औषध पॅकेजिंगचे नियम बदलले

Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे दोषी; मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा यावर सोमवारी निकाल

SCROLL FOR NEXT