पुणे, ता. १५ ः मुलांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास, शिस्त आणि सातत्याची वृत्ती विकसित करण्यासाठी ‘सिंपल स्टेप्स फिटनेस’तर्फे २९ नोव्हेंबरला ‘चिल्ड्रन्स रन फॉर हॅपिनेस’ या मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. दोन ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आयोजित ही स्पर्धा बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) मैदानावर होणार असून, स्पर्धेचे हे ११ वे वर्ष आहे.
या मॅरेथॉनसाठी ‘सकाळ’ हे माध्यम प्रायोजक आहेत. मुलांना मोबाइलपासून दूर करून मैदानी खेळ आणि व्यायामाकडे वळविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक धावपटू आशिष कासोदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होईल. त्यामध्ये दोन ते तीन वर्षांच्या मुलांसाठी १०० मीटर, चार ते सहा वर्षांसाठी दीड किलोमीटर, सात ते नऊ वर्षांसाठी तीन किलोमीटर, नऊ ते ११ वर्षांसाठी पाच किलोमीटर, तर १२ ते १५ वर्षांच्या मुलांसाठी सात किलोमीटर अंतराची धाव असेल. तसेच, १.५ आणि तीन किलोमीटरच्या गटांत आवश्यकतेनुसार एका पालकाला मुलासोबत धावता येणार आहे. तर, स्पर्धेत सहभागी मुलांना ‘गुडी बॅग’, धावण्याचा क्रमांक असलेले बिब, पदक, ई-प्रमाणपत्र, अल्पोपाहार आणि टी-शर्ट मिळणार आहे.
नोंदणी केलेल्या मुलांसाठी बीएमसीसीच्या मैदानावर शनिवार आणि रविवारी सायंकाळी सहा ते सात या वेळेत विशेष प्रशिक्षण सत्र होणार आहे. या वेळी मुलांना धावण्याची योग्य पद्धत, शारीरिक तयारी आणि नियमित व्यायामाबाबत मार्गदर्शन केले जाईल.
असे व्हा सहभागी
उपक्रमात भाग घेण्यासाठी इच्छुकांनी बातमीसोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
----------------
58602
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.