पुणे

‘सिप्ला फार्मा’चा पुण्यातील औषध विक्री परवाना रद्द

CD

पुणे, ता. २८ : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) न मिळणाऱ्या औषधाच्या पॅकेजिंगवर बेकायदा जाहिरात केल्याप्रकरणी तसेच साठवणुकीत गंभीर अनियमिततेप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) वडकी (पुणे) येथील ‘सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड’ या कंपनीवर धडक कारवाई केली आहे. कंपनीचा ‘सी अँड एफ’ औषध विक्री परवाना २७ ऑगस्टपासून तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे.

‘एफडीए’ने जून २०२६ मध्ये वडकी येथील ‘सिप्ला फार्मा’च्या मुख्य गोदामावर कारवाई केली होती. त्यावेळी ‘रिॲक्टिन प्लस टॅब्लेट’या शेड्युल एच औषधाच्या पॅकेजिंगवर अनालजेसिक व अँटीपायरेटीक असा परवानगी नसलेला मजकूर छापल्याचे उघडकीस आले होते. अशा जाहिरातीमुळे डॉक्टरांच्या सल्ल्याविना परस्पर औषधे घेण्याची प्रवृत्ती वाढून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ‘एफडीए’ने ११ लाख १९ हजार रुपयांचा साठा जप्त केला होता. संबंधित औषधाचा साठा बाजारातून परत मागविण्याचा आदेश दिला होता. मात्र, कंपनीने या आदेशाचे योग्य पालन केले नाही. परिणामी ‘एफडीए’ने औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियमाअंतर्गत कंपनीचा परवाना रद्द केला असल्याचे ‘एफडीए’ने स्पष्ट केले.

औषधांची सुरक्षितता आणि नागरिकांचे आरोग्य याबाबत कोणतीही शिथिलता दाखविली जाणार नाही. ‘शेड्यूल एच’ औषधांची जाहिरात, विक्री आणि साठवणूक यामध्ये कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.
- तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTAच्या कारभारात मोठा बदल; IAS-IPS सह ३ अधिकाऱ्यांची नियुक्ती, ३ आठवड्यांत रुजू होण्याचे आदेश, केंद्राचा महत्त्वाचा निर्णय

Bangladeshi Infiltrators Arrested : पुण्यात तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक; विशेष शाखा व लष्करी गुप्तचर यंत्रणेची कारवाई

Nepal Flood Viral Video: नेपाळमधील महापुरात 'ते' एकच घर कसं अभेद्य राहिलं? पुढे काय झालं? सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Nepal Flood: महापुराने संपूर्ण शहर वाहून नेलं, पण संकटाची चाहूल आधीच होती; नेपाळला दिलेला इशारा का दुर्लक्षित झाला?

राखीच्या धाग्याने बांधलं आपुलकीचं नातं; डोंबिवलीत हजारो भगिनींसोबत रविंद्र चव्हाण यांचा रक्षाबंधन सोहळा

SCROLL FOR NEXT