corona vaccination corona vaccination
पुणे

पुणे: गुरुवारी १९५ ठिकाणी होणार लसीकरण

गेल्या चार दिवसांपासून महापालिकेचे लसीकरण बंद असल्याने दुसऱ्या डोससाठी प्रतिक्षेत असलेले नागरिक हवालदिल झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेल्या चार दिवसांपासून महापालिकेचे लसीकरण बंद असल्याने दुसऱ्या डोससाठी प्रतिक्षेत असलेले नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यांना गुरुवारी लस उपलब्ध झाली आहे. केंद्र शासनाकडून पुणे शहरासाठी कोव्हीशील्ड ४६ हजार तर कोव्हॅक्सीनचे ४२५० डोस उपलब्ध झाले आहेत. ही लस एकच दिवस पुरेल एवढी आहे. उद्या शहरात कोव्हिशिल्डचे १८८ ठिकाणी तर ७ ठिकाणी कोव्हॅक्सिनचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

महापालिकेला बुधवारी ४६ हजार डोस मिळाले आहेत. त्याद्वारे १८८ केंद्रांवर प्रत्येकी २१० डोस पुरविण्यात आले आहेत. उर्वरीत साडे सहा हजार डोस विशेष लसीकरणासाठी वापरली जाणार आहे. तर कोव्हॅक्सिनचे प्रत्येक केंद्रावर ५०० डोस उपलब्ध आहेत. गुरुवारी नव्याने लस पुरवठा झाला तर शुक्रवारचे नियोजन केले जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.

कोव्हिशिल्ड

-पहिल्या डोससाठी १५ टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे

-पहिल्या डोससाठी १५ टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध

- पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (२जून) घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी ३५ टक्के लस ऑनलाइन

- थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी ३५ टक्के लस दुसऱ्या डोससाठी

कोव्हॅक्सिन

- पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी १५ टक्के लस

- पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी १५ टक्के लस

-२८ जुलै पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्यांना दुसऱ्या डोससाठी ३५ टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

- दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी ३५ टक्के लस उपलब्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT