पुणे

मंचर नगरपंचायत तळ्यात-मळ्यात; इच्छुक उमेदवार व नागरिक संभ्रमात 

डी. के. वळसे पाटील

मंचर : मंचर नगरपंचायतीची घोषणा अजूनही राज्य शासनाने केली नाही. तळ्यात-मळ्यात अशीच परिस्थिती नगरपंचायतीची सध्या आहे. मंचर ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. इच्छुक उमेदवारांनी जोरदार मोर्चे बांधणीही सुरु केली आहे. ग्रामपंचात की नगरपंचायत निवडणुकीसाठी सामोरे जावे लागणार याविषयी इच्छुक उमेदवार व नागरिकही  संभ्रमात आहेत.

मंचर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे. म्हणून गेल्या दहा दिवसांपूर्वी श्रेय घेण्याची लढाई महाविकास आघाडीतील दोन गटात झाली. शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, पुणे जिल्हा परिषद शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर, उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले, मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नगर पंचायत प्रस्तावावर शिंदे यांची स्वाक्षरी झाली आहे. येत्या चार-पाच दिवसात पत्रकार परिषद घेऊन पंचायतीची घोषणा होईल. असे आढळराव-पाटील यांनी जाहीर केले होते.

महाविकास आघाडीचे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले, आंबेगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार, अल्लू इनामदार, लक्ष्मण थोरात भक्ते, संतोष गावडे, सुहास बाणखेले, राजेंद्र थोरात, जे. के. थोरात यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे विधानभवनात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नगर पंचायत करण्याचे साकडे त्यांना घातले. अत्ता नगर पंचायतीची घोषणा लवकरच होणार असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे या नेत्यांनी जाहीर केले.

दोन्ही गटातील  दिग्गज नेत्यांनी मंत्रालय पातळीवर प्रयत्नांची पराकाष्टा केल्यामुळे नगरपंचायत होणार असा आत्मविश्वास मंचरकरांचा वाढला होता. पण श्रेयाची लढाई होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला. अजून याबाबत अधिकृत घोषणा शासनाकडून झालेली नाही. याउलट मावळ तालुक्यातील देहू ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत झाले आहे. दिग्गज राजकीय नेत्यांचा फौजफाटा असूनही मंचर नगरपंचायतीची घोषणा होत नसल्याने नागरिकांचा संभ्रम वाढला आहे. त्यातच भर म्हणून मंचर ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे मंचरकर ग्रामपंचायतीच्या की नगरपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे जाणार याविषयी प्रश्नचिन्हच आहे. 

दरम्यान मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगर विकास खात्याकडून अधिसूचना तपासणीसाठी न्याय व विधी विभागाकडे पाठविण्यात आली आहे. तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नगरविकास विभागाला याबाबत नगरपंचायतीची घोषणा करता येईल. पण मंचर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यासाठी प्रथम रीतसर निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल. आयोगाच्या मान्यतेनंतर ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रियेला स्थगिती द्यावी लागेल. त्यानंतरच नगरपंचायतीचे अधिकृत घोषणा शासनाला करता येईल. त्यामुळे या अवघड परिस्थितीतून कसा मार्ग निघणार ? याकडे मंचरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT