Bhuinj Crime News esakal
पुणे

Pune Crime News: पुण्यात प्रेम प्रकरणातून आणखी एक हत्या, महाविद्यालयीन युवकावर कोयत्याने वार करत घेतला जीव

कोयत्याने वार करुन युवकाचा खून करण्यात आला. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी दोन पथके पाठवली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुणे शहर परिसर एका २१ वर्षीय तरुण्याच्या हत्याकांडने हादरले आहे. पुण्यात २१ वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा युवक बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. दरम्यान आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. महेश डोके असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी बकोरी रोड वाघोली येथे एका 21 वर्षीय मुलावर कोयत्याने वार करण्यात आले. जखमी झालेल्या तरूणाला त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याच्या प्रकृतीची परिस्थिती पाहून त्याला ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सदर युवक हा बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता व वाढेबोलाही येथे एका होस्टेलमध्ये राहत होता (Marathi Tajya Batmya)

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तपासा दरम्यान समोर आलेल्या बाबीनुसार ही हत्या समलैंगिक संबंधातून झाल्याचा दाट संशय आहे. परंतु नेमक्या कारणाचा अजूनही पोलीस शोध घेत आहेत. आरोपीच्या शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाचे भाव वाढले! CNG दरवाढीनंतर आता पेट्रोल-डिझेलही महाग? पाहा महाराष्ट्रातील आजचे दर

‘ती’ पुन्हा येतेय! नजरेत तलवार, चाल अंगार, झी मराठीच्या नव्या मालिकेच्या प्रोमोतील ‘ती’ अभिनेत्री नेमकी कोण?

Pune Satara Highway: खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी ट्रक पलटी; दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा, वाहतूक विस्कळीत

Marathi News Live Updates : BMCची उधळपट्टी, ४ मिनिटांच्या माहितीपटासाठी ६ लाखांचा खर्च

Pakistan Match Fixing : पाकिस्तानी फिक्सर, इंग्लंड दौऱ्यावर संशयास्पद घडामोडी! फोन जप्त, PCB कडून चौकशी; खूप मोठी नावं अडकणार?

SCROLL FOR NEXT