pune sakal
पुणे

देशभक्तीच्या देखाव्यावर भाष्य

दाद

नीला शर्मा

स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अनेक जण देशप्रेमाचं बेगडी प्रदर्शन मांडतात. आपल्या राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृती त्या-त्या दिवसापुरत्या देखाव्यासाठी मिरवून दुसऱ्या दिवशी वाटेल तेथे टाकून दिल्या जातात.

मुंबईतील एनकेइएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी खास स्वातंत्र्य दिनानिमित्त बनवलेला ‘सम्मान’ हा हिंदी लघुपट अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालतो. एका शाळकरी मुलाच्या मनात राष्ट्रध्वजाबद्दल काय येतं, ते या कलाकृतीतून प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे.

लघुपटाच्या सुरवातीला मोठा भाऊ दुधात कुठलासा बाजारू पदार्थ मिसळून ते पिताच, चेहरा कसनुसा करतो. ‘‘या पदार्थाची एक्स्पायरी डेट संपली आहे गं आई. मला नको हे दूध,’’ असं सांगतो.

धाकट्या भावाला शाळेत सोडून तो महाविद्यालयात जाणार असतो. वाटेत धाकटा त्याला, ‘‘एक्स्पायरी डेट म्हणजे काय,’’ असं विचारतो. ‘‘एका विशिष्ट मुदतीनंतर ती वस्तू किंवा पदार्थ कालबाह्य होतो,’’ असं उत्तर तो देतो. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रस्त्यात लोक राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृती मिरवत असल्याचं पाहून धाकटा स्वतःसाठी मागतो. थोरला त्याला दुकानातून छोटासा तिरंगा घेऊन देतो.

मुलाच्या मनातील भावतरंग

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची कुवत तुमच्यात नसेल तर मग तो घेऊच नका,’ असाच धडा या लघुपटातून मिळतो. यातील मुलाच्या मनातील भावतरंगांवर आधारित हे आवाहन फार परिणामकारक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Dowry death case : जन्मताच संघर्ष! आईने जीवन संपवलं बापावर हुंडाबळीचा गुन्हा; अस्मिताच्या मुलीचे संगोपण चुलत सासू करणार, पोलिसांचेही डोळे पाणावले

Leopard Sighting Jyotiba Dongar : बाप रे! जोतिबा डोंगरावरील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात फिरताना दिसला बिबट्या; पाहा अंगावर काटा आणणारा CCTV

Latest Marathi News Live Update : नागपुरात नगरसेवक वसीम खान यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे कारण?

Supreme Court : मतदार यादीतून नाव गायब... मग रेशनही बंद? सर्वोच्च न्यायालयाने दिलं मोठं स्पष्टीकरण

Mumbai Local Attack : मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजित घटना ! धावत्या ट्रेनमध्ये तिघांनी तरुणावर केले सपासप वार

SCROLL FOR NEXT