Ganesh-Bidkar sakal
पुणे

आयुक्त राज्य सरकारच्या दबावाखाली; गणेश बीडकर यांची टीका

भाजपविरोधात शिवसेनेचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यासंदर्भात (डीपी) उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत महापौरांना प्रतिवादी केले आहे. पण राज्य सरकारच्या दबावाखाली आयुक्त पालिकेची बाजू मांडण्यासाठी वकील देत नाहीत. आमचे ऐकत नाहीत. महापालिकेचा पगार घेणाऱ्या आयुक्तांनी महापालिकेची नाचक्की थांबवावी अशी टीका सभागृहनेते गणेश बीडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. (Pune News)

स्थायी समितीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांसाठी महापालिकेने वकिल देऊन खर्च करावा असा ठराव भाजपने स्थायी समितीमध्ये केला. त्यावर विरोधी पक्षांनी "भाजपच्या याचिकेसाठी पालिकेचा पैसे का अशी टीका केली आहे. त्यावर बीडकर यांनी बाजू मांडली.

जनहित याचिकांमध्ये महापौर तसेच पालिकेच्या सभागृहाला वादीवादी प्रतिवादी केले आहे. आयुक्त हे राज्य सरकारचे प्रतिनिधी असले तरी ते महापालिकेकडून पगार घेतात. त्यामुळे पालिकेचे हित त्यांनी जपलेच पाहिजे.

महापौर पद हे संविधानिक पद आहे, त्यामुळे त्यासाठी महापालिकेने वकिल दिला पाहिजे. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीमध्ये आयुक्तांनी राज्य सरकारच्या विरोधात वकिल दिला नाही. अनेकदा फोन केले पण त्यांनी उचलले नाहीत. यापूर्वी पुण्यातील गाजलेल्या गिरीश व्यास व राज्य सरकार विरोधातील याचिकेत तत्कालीन आयुक्तांनी वकिल दिला नव्हता, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेला वकिल देण्यास सांगितले होते, याची आठवण यावेळी बीडकर यांनी करून दिली.

ठरावा विरोधात शिवसेनेचे आंदोलन

उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या व होणाऱ्या याचिकांचा खर्च महापालिकेने करावा असा ठराव केल्याने शिवसेनेतर्फे महापालिका भवनापुढे आंदोलन करून भाजपचा निषेध केला. कायद्यानुसार आयुक्त हे राज्य सरकारचे प्रतिनिधी आहात. महापालिकेचे प्रशासकीय प्रमुख असल्याने राज्य सरकारच्या विरोधातील खासगी जनहित याचिकेच्या वकिलांचा व याचिकेचा खर्च पुणेकरांच्या माथी मारू नका. भाजपा सत्ताधाऱ्यांकडून होत असणारा भ्रष्टाचार रोखणे आयुक्तांचे कर्तव्य आहे. अशा मागणीचे निवेदन यावेळी अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांना देण्यात आले.

यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, जिल्हा प्रमुख विजय देशमुख, रमेश कोंडे, सहसंपर्कसंघटिका किर्ती फाटक, शहर संघटिका सविता मते, नगरसेवक अविनाश साळवे, विशाल धनवडे , सचिन भगत, शहर संघटक राजेंद्र शिंदे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, भरत कुंभारकर, महेश पोकळे, अशोक हरणावळ, तानाजी लोणकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीची इनसाईड स्टोरी! ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरुन प्रियंका गांधींचा संताप; म्हणाल्या....

Sachin Vaze: सचिन वाझेंची ५ वर्षांनी जामिनावर सुटका; ५ जिल्ह्यात प्रवेश न करण्याची अट

Stock Market Crash: 4 दिवसांत गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी स्वाहा! शेअर बाजार का कोसळला?

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

Heart Health: ताजी फळे खाणे की ज्युस पिणे? हृदयाच्या आरोग्यासाठी नक्की काय उत्तम? पाहा संशोधन!

SCROLL FOR NEXT