पुणे

Exclusive: "थर्ड पार्टी ऑडिट'बाबत गोलमाल;आयुक्तांकडून गंभीर दखल 

ज्ञानेश सावंत - सकाळ वृत्तसेवा

पुणे - नव्याने बांधलेले डांबरी, सिमेंटचे रस्ते खचलेत, फूटपाथवरचे "ब्लॉक' उखडलेत, "ड्रेनेजलाइन' तुंबल्या आहेत, त्यावरील चेंबर तुटलेत, जलवाहिन्या फुटल्या आहेत, विजेचे खांब खराब झालेत... अशा एक-दोन नव्हे तर दीड हजार पुणेकरांच्या तक्रारी आहेत. पण ठेकेदारांमार्फत केलेली कामे चांगली आणि ती निविदेप्रमाणे झाल्याचा अभिप्राय महापालिकेने नेमलेल्या "थर्ड पार्टी ऑडिट'ने दिला आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या 90 टक्के कामांवर शंकाही घेता येणार नाही, असे या पाहणीतून पुढे आले आहे. 

पुणेकरांच्या तक्रारी वाढल्या आहेत. रस्त्यांवरच्या कामांची दुरवस्थाही झाली आहे; तरीही असा अभिप्राय पाहून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी अवाक्‌ झाले आहेत. अशा अहवालाची गंभीर दखल घेत, आता "थर्ड पार्टी'ऐवजी महापालिकेच्या दक्षता समितीनेच विकास कामांवर नजर ठेवण्याची घोषणा आयुक्त कुमार यांनी बुधवारी केली. 

पुणेकरांना पायाभूत सेवा-सुविधा पुरविताना महापालिकेच्या मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात. रस्ते, ड्रेनेजलाइन, ओढ्या-नाल्यांची देखभाल, विद्युतविषयक कामे, रंगरंगोटीच्या कामांचा समावेश आहे. ही कामे ठेकेदाराकडून करून घेण्यात येतात. परंतु, या कामांचा दर्जा राखला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यावर ही कामे तपासण्यासाठी महापालिकेच्या वतीने "थर्ड पार्टी'च्या माध्यमातून कामांचा पाहणी केली जाते. त्यासाठी "थर्ड पार्टी'ला पैसेही मोजले जातात. परंतु, वर्षांनुवर्ष ठराविक कंपन्यांकडे ही कामे दिली जात असल्याने खोटा अहवाल दिला जात असल्याचे आयुक्त कुमार यांच्याच निदर्शनास आले आहे. 

काही कामे अपूर्णच 
पुणे शहरात ड्रेनेजलाइनसह विविध स्वरूपाच्या सेवा वाहिन्या विशेषत: विजेच्या वाहिन्या भूमिगत करण्याची कामे होतात. प्रामुख्याने ड्रेनेजलाइनची कामे मोठ्या प्रमाणात करीत, त्यावर वर्षाला शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येतो. मात्र, त्यातील काही कामे केली जात नसल्याचे काही नगरसेवकच कबुली देतात. अशी कामे काही ठिकाणी झाली नसल्याचे पुरावे काही वर्षांपूर्वी महापालिकेकडे आली होती. तरीही सरसकट कामे ही निविदेप्रमाणे झाल्याचा अहवाल दिला जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील प्रत्येक काम तपासले जाणार आहे. प्रामुख्याने कामाचा दर्जा, त्याच्या अंमलबजावणीचा वेग आणि पूर्णत्वाची मुदत या बाबी महत्त्वाच्या आहेत. निविदेतील अटी-शर्तीनुसार काम करून घेण्यावर भर दिला जाईल. त्यासाठी दक्षता विभागाचे अधिकारी-कर्मचारी रस्त्यांवर उतरतील. 
- राजेंद्र मुठे,  प्रमुख, दक्षता विभाग पुणे महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT