shetmal 
पुणे

शेतमाल खरेदी-विक्रीचे सौदे सलग 3 दिवस नाही राहणार बंद; पणन संचालनालयाचा निर्णय

सकाळवृत्तसेवा

पुणे : बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी विक्रीचे सौदे बंद राहिल्यामुळे शेतमालाच्या प्रतीवर परिणाम होऊन दर कमी होतात. ग्राहकांना वाढीव दराने धान्य, फळे, भाजीपाला खरेदी करावा लागतो. तसेच, पुन्हा शेतमालाची आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक यांचे नुकसान टाळण्यासाठी बाजार समित्यांना शेतमाल खरेदी विक्रीचे सौदे सलग तीन दिवस बंद ठेवता येणार नाहीत. पणन संचालकांनी सतीश सोनी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार काही बाजार समित्या धार्मिक सण आणि त्याला जोडून साप्ताहिक सुटी असे सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवतात. काही बाजार समित्यांमध्ये यात्रा, अमावस्या किंवा व्यापाऱ्यांचा दौरा, आर्थिक वर्षअखेर दिवस, विवाह समारंभ या कारणांसाठी बाजार समितीमधील सौदे बंद ठेवतात. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक यांचे नुकसान होते. 

- राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बाजार समितीने वर्षाच्या सुरवातीलाच साप्ताहिक आणि इतर सुट्यांचे दिवस निश्चित करावेत. त्याबाबत उपनिबंधक सहकारी संस्था यांची ३१ मार्चपूर्वी मान्यता घ्यावी. परंतु सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस शेतमाल खरेदी-विक्रीचे सौदे बंद राहणार नाही, याची बाजार समितीने दक्षता घ्यावी.  शेतमाल खरेदी-विक्रीचा कालावधी निश्चित करून सौदे होण्यासाठी पुरेसा वेळ दिला जावा. अचानक काही कारणासाठी एखादा दिवस बाजार बंद ठेवण्याची गरज भासल्यास संबंधितांना पूर्वसूचना देण्यात याव्यात. एखादा व्यापारी वैयक्तिक कारणासाठी सुटी घेता येईल. परंतु कोणत्याही परिस्थितीत सर्व व्यापारी एकाच दिवशी शेतमाल खरेदीचे व्यवहार बंद ठेवणार नाहीत. सुटीच्या दिवसाव्यतिरिक्त इतर दिवशी व्यापाऱ्यांनी बाजार बंद ठेवल्यास बाजार समितीने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियमानुसार कारवाई करावी. तसेच, व्यापार सुरू राहील, यासाठी बाजार समितीने पर्यायी व्यवस्था करावी. 
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • - बाजार समितीने सौदे बंद असल्याचे दिवस सूचना फलकावर जाहीर करावेत. 
  • - वर्षभराच्या नियोजनाबाबत ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महापालिका कार्यालयास सूचित करावे. 
  • - २०२१-२२ च्या सुट्यांबाबत ३० एप्रिलपर्यंत संबंधित जिल्हा उपनिबंधकांची मान्यता घ्यावी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Dilip Walse Patil Meeting : सिल्व्हर ओकवर शरद पवार-दिलीप वळसे पाटील यांची भेट; चर्चांना उधाण, दोन्ही गट एकत्र येणार?

किती रुपयांत बुक करू शकता नवी कोरी Tata Tiago EV फेसलिफ्ट? जाणून घ्या बूकिंगची साधी सोपी प्रोसेस

वडील भारताकडून खेळू शकले नाहीत, पण पोरगा आता FIFA World Cup खेळणार! कोण आहे तो जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये गेवराईत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Nagpur News नागपुरात पोलिसांवर हल्ला, कार अंगावर घालण्याचा प्रयत्न, महिला पोलिसाला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT