Pune Loksabha Constituency  sakal
पुणे

Pune Loksabha Constituency : आता पुण्यात इतिहास घडविणार ; इंडिया आघाडीच्या बैठकीत नेत्यांचा विश्‍वास,सर्व घटक पक्षांची उपस्थिती

कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने एकजूट दाखविल्यामुळे इतिहास घडला. लोकसभा निवडणुकीतही इंडिया आघाडीने अशीच एकजूट दाखविली; तर पुण्यात इतिहास घडू शकतो, असा विश्‍वास इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने एकजूट दाखविल्यामुळे इतिहास घडला. लोकसभा निवडणुकीतही इंडिया आघाडीने अशीच एकजूट दाखविली; तर पुण्यात इतिहास घडू शकतो, असा विश्‍वास इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत व्यक्त केला.

काँग्रेस भवनात इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मोहन जोशी, अंकुश काकडे, सुभाष वारे, अजित अभ्यंकर, संदीप ताम्हणकर, वसंत पवार, दत्ता पाकिरे, अन्वर राजन, संदीप बर्वे, इब्राहिम खान, अशोक तातुगडे, संदेश दिवेकर, दीपक पाटील, लता भिसे, अरविंद जक्का यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, महाविकास आघाडीतील नेते, सामाजिक व स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘‘इंडिया आघाडीच्या माध्यमातून आपली ताकद वाढली आहे. विविध स्वयंसेवी व पर्यावरणवादी संघटनांचे कार्यकर्ते बरोबर आहेत. संविधान वाचविण्यासाठी, हुकूमशाही मोडून काढण्यासाठी आपण लढायचे आहे. धंगेकर निवडणुकीनंतर संसदेत पुणेकरांचा आवाज ठामपणे मांडतील.’’ धंगेकर म्हणाले, ‘‘कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी राहिले. आता इंडिया आघाडीचे कार्यकर्तेही माझ्याबरोबर आले आहेत. एकदिलाने काम करून आपण पुन्हा इतिहास घडवू.’’

काकडे म्हणाले, ‘‘पुणे लोकसभेसाठी काँग्रेसमधून अनेक इच्छुक होते. मात्र धंगेकरांना उमेदवारी मिळाली. आता कोणीही नाराज नाही. सर्वजण स्वतःला धंगेकर व उमेदवार समजून काम करत आहेत. महाविकास आणि इंडिया आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचारात झोकून द्यावे.’’ संविधानाप्रती निष्ठा, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन सर्व समाजघटकांना एकत्र आणत भाजपचा पराभव करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात विविध सूचना इंडिया फ्रंट आघाडीतील प्रमुखांकडून करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT