पुणे

‘एमआरपी’विरोधात देशव्यापी आंदोलन

CD

पुणे, ता. १५ : वस्तूंवर छापल्या जाणाऱ्या अवाजवी ‘एमआरपी’मुळे (मॅक्सिमम रिटेल प्राइस) ग्राहकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केंद्र सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. आता जनजागृती मोहीम सुरू असून, २५ मे रोजी दिल्लीत जंतर-मंतर येथे राष्ट्रीय स्तरावर निदर्शने केली जाणार आहेत, अशी माहिती पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक यांनी दिली. उत्पादक कंपन्या उत्पादन खर्चाच्या अनेक पटींनी अधिक किंमत छापून ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. प्रामुख्याने सौंदर्यप्रसाधने, इलेक्ट्रॉनिक्स, खाद्यपदार्थ आणि औषधांच्या किमतीत मोठी तफावत आढळल्याचे पाठक यांनी नमूद केले. या संदर्भात केंद्र सरकारकडे विविध मागण्या केल्या असून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात येत आहेत. ‘एमआरपी’ची संकल्पना ग्राहकांच्या हितासाठी असली, तरी सध्या तिचा गैरवापर होत असल्याने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडल्याचे पंचायतीने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: बेशुद्ध लेकीला खांद्यावर घेऊन बाप पायीच निघाला; रुग्णवाहिकेतून उतरवलं, डॉक्टर म्हणाले, पोरं कशाला पैदा केले...

Nagpur News : डॉ. मयुरी येवले यांना मँचेस्टर विद्यापीठाची फेलोशिप; आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी निवड

Maharashtra Live News : "शेतकऱ्यांचा हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही"; ५ हजारांच्या मदतीवरून अनिल देशमुखांची टीका

Dhirubhai Ambani: भारताला केवळ बचत नव्हे, तर गुंतवणुकीतून मालकी हक्क मिळवायला शिकवणारे गुजराती उद्योजक

अरबी समुद्राचं सुंदर दृश्य, दुर्मिळ चित्रांचा खजिना; 53 व्या मजल्यावरील माधुरी दीक्षितचं आलिशान घर पाहिलंत का?

SCROLL FOR NEXT