pune sakal
पुणे

राष्ट्र निर्माण आणि समाज विकासामध्ये सिंधी समाजाचे योगदान ; केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह

उंड्रीतील कोरिएंथन क्लबमध्ये सिंधी समाजाचे आंतरराष्ट्रीय 27 वे संमेलन

अशोक बालगुडे

उंड्री : परंपरा, संस्कृती आणि भाषा यांचे जतन आणि संवर्धन करून तिला विकसित करण्याचा समाज प्रयत्न करतो. सिंधी समाजासमोर अनेक अडचणी आहेत. राष्ट्र निर्माण आणि समाज विकासामध्ये सिंधी समाजाचे मोठे योगदान आहे. भारताचे वीर क्रांतिकारी योग स्वातंत्र्य सेनानी शहीद हेमकलानी यांनी कुमारावस्थेमध्येच हसत हसत भारतीय स्वातंत्र्यासाठी वीरमरण स्वीकारले. उत्साहपूर्ण, अजून मेहनतीमुळे आज स्वतंत्र भारतामध्ये सिंधी समाजाने आपलं एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे, असे केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले.

उंड्री (ता. हवेली) येथील कोरिएंथन क्लबमध्ये सिंधी समाजाचे आंतरराष्ट्रीय 27 वे संमेलन जल्लोषात सुरू झाले. संत झुलेलाल यांच्या प्रतिमेची पूजन करीत पुष्पवृष्टीनंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. रथयात्रेत भगवान झुलेला यांची प्रतिमा, पाकिस्तानातील संत सादराम, संत राजेशलाल यांची सायंकाळी सहा वाजता बँडबाजाच्या तालावर नृत्य गीत गायन करीत मिरवणूक काढण्यात आली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी हजुरी स्वरूप साई साधराम, संत कंवरराम साहेब गद्दिशान साई राजेश लाल, एजीएसएचे अध्यक्ष दातुक शाह रनाई, आयोजक सुहिंना सिंधी पुणेचे अध्यक्ष पिटर पितांबर ढलवानी, आफ्रिकेचे वाणिज्य दूत पमन दासवानी, मोहन डोडानी, दीपक रामचंदानी, हीरो शिवदासानी, भारतीय सिंधु सभेचे अध्यक्ष लधाराम नाथवानी, भाजपा मध्य प्रदेशचे महासचिव भगवानदास सबनानी, गुजरातचे माजी मंत्री परमानंद खट्टर, माजी खासदार सुरेश केसवानी, माजी आमदार डॉ गुरमुख जगवानी, स्पेनचे सतीश रायसिंघानी, सिंधी कौन्सिल ऑफ इंडियाचे मोहन लधानी यांच्यासह मुंबई, पुणेसह देश आणि विदेशातील सिंधी बांधव उपस्थित होते. यावेळी पिंकीजा इदासानी, मंजुजी आसुदानी, नील तलरेजा यांचा संगीताचा कार्यक्रम झाला.

जगभरामध्ये जेथे जेथे संमेलन होते, तेथे आवर्जून जातो. सिंधी भाषा प्रत्येकाने शिकली पाहिजे, सिंधी भाषेचा प्रसार करण्यात समाधान वाटते. जगभरामध्ये पुणे शहराचा नावलौकिक आहे. शासन टोल आणि कर घेते, तर रस्ते का करत नाही. रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे पाठीचा-मणक्याचा त्रास जाणवला.

मोती विसा, ऑस्ट्रेलिया

सिंधी समाजाच्या आंतरराष्ट्रीय संमेलनाची शुक्रवारी सुरुवात झाली असून, रविवारी सांगता होणार आहे, असे आयोजक पिटर दलवानी, डॉ. गुरूमुख जवानी, मनोहर फेरवानी, राजीव कृष्णानी यांनी सांगितले.

कविता इसरानी, सिमरन अहुजा, मोहित शेरवानी, किशन रामनानी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Ambadas Danve News: रक्ताने माखलेला शर्ट, दानवेंनी वाचवला एका व्यक्तीचा जीव...

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

SCROLL FOR NEXT