rajesh tope sakal
पुणे

निवृत्ती महाराजांना आपण लसीचे महत्व पटवून देऊ : राजेश टोपे

मिलिंद संगई ः सकाळ वृत्तसेवा

बारामती : ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी लसीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना आपण स्वताः लसीचे विज्ञानाच्या दृष्टीने महत्व पटवून देणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज बारामतीत दिली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची गोविंदबाग येथे भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. निवृत्तीमहाराजांनी मी लस घेतली नाही व घेणारही नाही असे वक्तव्य केले होते, त्या बाबत पत्रकारांनी विचारणा केली असता राजेश टोपे यांनी वरील प्रतिपादन केले.

टोपे म्हणाले, निवृत्ती महाराजांचा आणि माझा निकटचा परिचय आहे, त्यांची कीर्तनाची शैली काहीशी वेगळी असल्याने लोकांना ती आवडते. वेगळ्या पध्दतीने ते समाजप्रबोधन करत असतात, लसीबाबत त्यांनी जे वक्तव्य केलेले आहे, त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोलणार आहे. कोविडवर लस प्रभावशाली आहे, त्या मुळे रक्षण होते व लस कवचकुंडलांसारखेच काम करते, लस घेतल्यानंतर कोरोना होतच नाही असे नसले तरी लस घेतल्याने शरीरात अँटीबॉडीज तयार होतात ही बाब सिध्द झाली आहे, त्या मुळे प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे. महाराजांना आपण या बाबतचे महत्व निश्चित पटवून देऊ.

एका प्रश्नाच्या उत्तरात राज्यात आतापर्यंत सात कोटी नागरिकांना पहिला डोस तर तीन कोटी नागरिकांना दुसरा डोस दिल्याची माहिती टोपे यांनी दिली. पहिल्या डोसचे 73 तर दुस-या डोसचे 34 टक्के उद्दीष्ट राज्याने पूर्ण केले आहे. राज्य सरकार रुग्ण किंवा मृत्यू या दोन्ही बाबतचे आकडे पारदर्शकतेने देत आहे, यात आकडेवारी लपविण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Dhangekar: माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल; खलील शेख प्रकरणात मोठी कारवाई

Nagpur News : रामभक्तांना ‘हरामखोर’ म्हणणाऱ्यांना ‘रामरक्षा’ आठवली! निमंत्रणावरून संजय राऊतांवर संदीप जोशींचा घणाघात

वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ बाळगणे अनिवार्य, विश्वास नांगरे पाटील यांचे थेट आदेश

BREAKING: रोहित शर्मा Lords वर निवृत्ती जाहीर करणार? IND vs ENG तिसरा वन डे सामना शेवटचा, धक्का देणारी Inside Story

VIDEO : मुंबईत मोठी दुर्घटना! ११व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, १२ गाड्यांचं मोठं नुकसान, एक जण जखमी...

SCROLL FOR NEXT