पुणे

सहकारी साखर कारखान्यांच्या

CD

सहकारी साखर कारखान्यांच्या
कर्जविनियोगाची होणार तपासणी
---
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २९ : राष्ट्रीय सहकार विकास निगमने (एनसीडीसी) महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाचा कारखान्यांनी केलेला विनियोग तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये अंशतः बदल करण्यात आला असून साखर आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतील. संबंधित प्रादेशिक सहसंचालक (साखर) सदस्य, तर साखर आयुक्त कार्यालयातील संचालक (अर्थ) हे सदस्य सचिव असणार आहेत.
कर्ज मंजूर करताना घातलेल्या अटी, संबंधित शासन निर्णयातील अटी-शर्ती तसेच कर्ज महाराष्ट्र शासनामार्फत मंजूर करण्याबाबतच्या राज्य शासनाच्या धोरणानुसार मंजूर कर्जनिधीचा संबंधित कारखान्यांकडून सुयोग्य विनियोग होत आहे किंवा नाही, याची समिती तपासणी करणार आहे. तसेच कर्जाचा गैरवापर झाला आहे किंवा नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे. एनसीडीसीने जून २०२५ मध्ये केलेल्या तपासणीत कर्जाच्या विनियोगात गैरवापर आढळलेल्या तसेच समितीच्या तपासणीत गैरवापर आढळणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध करावयाच्या कारवाईबाबत समिती शासनाला शिफारस करणार आहे. कारखानानिहाय निरीक्षणांनुसार माहिती शासनाला सादर केली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील जुन्या सहकारी साखर कारखान्यांनी विस्तारिकरणासाठी हे कर्ज घेतलेले आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतरच जिल्ह्यातील कारखानदारांनी या कर्जाचा विनियोग कसा केला? याची माहिती समोर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Everest च्या हिंगच्या विक्रीवर तात्काळ बंदी! FSSAI च्या तपासणीत सॅम्पल फेल, आणखी एका कंपनीवरही कारवाई

Neeraj Chopra २०२६ वर्षात आता पुन्हा मैदानात दिसणार नाही, स्वत:च सांगितलं कारण; Asian Games आधी भारताला धक्का

Education Leader Passes Away: शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे निधन; विद्यार्थी चळवळ व राज्य शिक्षण धोरणात मोठे योगदान

Pune Cable Policy : पुणे महापालिकेचे दोन हजार कोटी वाचले; आयुक्तांच्या हस्तक्षेपामुळे वादग्रस्त केबल धोरण मागे

September Lucky Zodiac Signs: सप्टेंबर ठरणार 'या' 5 राशींसाठी लकी! 3 राजयोगांमुळे मिळणार पैसा, करिअर, व्यवसायात भरगोस यश

SCROLL FOR NEXT