rajesh deshmukh sakal
पुणे

पुणे : मानव वन्यजीव संघर्षाबाबत समन्वय समितीची बैठक संपन्न

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे वन विभागाच्या (pune forest department) वतीने शहरात वाढत असलेल्या मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी समन्वय समितीची स्थापना केली आहे. या समितीची पहिली बैठक नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (rajesh deshmukh) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मानव - वन्यप्राणी संघर्ष हाताळताना नागरिकांनी काय खबरदारी बाळगावी, तसेच अशा वेळी वन विभागाला (forest department) सहकार्य करण्याची सूचना दिली.

या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक जयराम गौडा, उपविभागीय वनाधिकारी (भोर) आशा भोंग, रेस्क्यू चॅरिटेबलच्या नेहा पंचमीया, द ग्रासलँड ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गोडबोले आदी समितीचे सदस्य उपस्थित होते.

मानवी वस्तीत वन्यप्राणी आल्यावर त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाठविण्याकरिता लागणारे साहित्य, टीमचे सदस्य वेळेत उपलब्ध होतील याचे नियोजन करणे तसेच अशावेळी नागरिकांची भूमिका काय असावी या सर्व गोष्टींबाबत या प्राथमिक बचाव टीमला प्रशिक्षण देण्यात आले आहे. दरम्यान या पथकाच्या प्रशिक्षणाचे कार्य कसे सुरू आहे याचा वेळोवेळी समिती मार्फत आढावा घेण्यात येत आहे.

 यावेळी पाटील म्हणाले, ‘‘मानव-वन्यजीव संघर्षाबाबत समन्वय साधण्यासाठी वन विभागातर्फे स्थानिक पातळीवर ‘प्राथमिक बचाव टिम’ची स्थापना करण्यात आली आहे. या मार्फत नागरिकांमध्ये मानव-वन्यजीव संघर्षाबाबत जनजागृती करण्याचे काम ही वनविभाग करत आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT