पुणे

भिगवण येथील 18 जणांची कोरोना टेस्ट...

प्रा. प्रशांत चवरे

भिगवण : भिगवण स्टेशन येथील महिला कोरोना संक्रमित झाल्यानंतर महिलेच्या संपर्कातील 8 नातेवाईक व उपचार घेतलेल्या हॉस्पिटलमधील 14 अशा एकूण 22 जणांच्या घशातील द्रव्य तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. यातील 22 पैकी 18 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे तर उर्वरित चार जणांचे रिपोर्ट्स येणे बाकी आहे. बहुतांश कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे भिगवण व परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

भिगवण स्टेशन येथील महिलेची मंगळवारी (ता.२८) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे भिगवण स्टेशन, भिगवण, तक्रारवाडी परिसरामध्ये तणावाचे वातावरण होते. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, प्रातांधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी डॉ. अमित उदावंत, भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने आदींनी 
बैठक घेऊन तातडीने तीन किलोमीटरचा परिसर सील केला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महिलेच्या संपर्कातील ८ नातेवाईक व महिलेने खासगी रुग्नालयांमध्ये उपचार घेतलेल्या ठिकाणच्या डॉक्टर व इतर १४ कर्मचाऱ्यांना बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये क्वारंटाईन करत त्यांचे घशातील द्रव्य तपासणी पुण्याला 
पाठविण्यात आले होते. या 22 पैकी 14 जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल बुधवारी (ता.२९) रात्री उशिरा तर 4 जणांचे अहवाल गुरुवारी (ता.३०) सकाळी प्राप्त झाले. 18 व्यक्ती कोरोनाबाधित नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भिगवणकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.

याबाबत भिगवण प्राथमिक अरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित उदावंत म्हणाले, 22 पैकी 18 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामध्ये कुटुंबातील चार व्यक्ती, तसेच खासगी रुग्नालयांतील १४ डॉक्टर व कर्मचारी यांचा समावेश आहे. कुटुंबाच्या ४ मित्रांचे अहवाल येणे बाकी आहे ते अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने म्हणाले, भिगवण स्टेशन येथे कोरोना रुग्ण आढळल्यामुळे भिगवण, भिगवण स्टेशन, डिकसळ, तक्रारवाडी हा परिसर सील करण्यात आला आहे. किराणा, भाजीपाला आदी अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यासंदर्भात सुचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांना घरांमध्येच थांबून सहकार्य करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT