पुणे

मोठी बातमी : पुण्यात उतरणार सशस्त्र पोलिस दल 

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस दलाच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची १२० जवानांची एक तुकडी पुणे शहरात दाखल होणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊन काळात पोलिस दल मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तात अडकलेले आहे़. तर राज्यात सुमारे एक हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणुची लागण झाली आहे़. त्यामुळे मोठ्या संख्येने पोलिसांना क्वारंटाईन करावे लागले आहे. तसेच ५५ वर्षांवरील पोलिस कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून रजा देण्यात आली आहे़. त्यामुळे उरलेल्या पोलिस दलावर बंदोबस्ताचा मोठा ताण आला आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दीड महिन्याहून अधिकच्या बंदोबस्तामुळे पोलिसांची दमछाक झाली आहे. त्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आणि आगामी रमजान ईद सणजवळ आल्याने पोलिसांच्या मदतीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय सशस्त्र दलाच्या २० तुकड्यांची मागणी केंद्राकडे केली आहे. त्या तुकड्या राज्यात दाखल झाल्यानंतर मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र दलाच्या १२० जवानांची तुकडी पुणे शहराला मिळणार आहे. शहरात ६९ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. या ठिकाणी पुणे पोलिसांना ही तुकडी बंदोबस्तासाठी सहाय्य करेल, अशी माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

T20 World Cup ENG vs WI : वेस्ट इंडिजने पुन्हा इंग्लंडला नमवले ! स्वतः सेफ झाले, पण क गटात स्कॉटलंडसोबत लावलं भांडण

Pune Accident: दोरी घासून गळा कापला! ठेकेदाराचा निष्काळजीपणा तरुणाच्या जिवावर; पुण्यातली घटना

Shreyas Talpade FIR : राजपाल यादवनंतर आता अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत ; ‘या’ प्रकरणी दाखल झाला ‘FIR’!

Uruli Kanchan Accident : उरुळी कांचन येथे पोलीस स्टेशन समोर कंटेनर व पिकअपचा अपघात एक ठार, तीन जखमी

SCROLL FOR NEXT