saras baug chaupati sakal
पुणे

Pune News : सारसबाग चौपाटीच्या पुनर्रचनेचा खर्च जाणार २० कोटीच्या पुढे

सारसबाग चौपाटी येथील रस्ता बंद करून तेथे या चौपाटीची पुनर्रचना केली जाणार आहे. यासाठी ७८ गाळे काढण्यात येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सारसबाग चौपाटी येथील रस्ता बंद करून तेथे या चौपाटीची पुनर्रचना केली जाणार आहे. यासाठी ७८ गाळे काढण्यात येणार आहेत. पूर्वीच्या आराखड्यात बदल करून हा नवीन आराखडा अंदाज समितीने (इस्टिमेट कमिटी) मंजूर केला आहे. त्यामध्ये याचा खर्च ८ कोटीवरून थेट १८ कोटी ५० लाखावर पोचला आहे. तर भूमिगत वाहनतळही केले जाणार असून, त्याचा खर्च आणखी दोन ते तीन कोटीने वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यात येणाऱ्या पर्यटकांना सारसबागेचे आकर्षण कायम आहे. पुणेकरही सकाळी व्यायामासह संध्याकाळी विरंगुळ्यासाठी या उद्यानात जातात, येथील चौपाटीवर विविध प्रकारचे खाद्यपदार्थांची रेलचेल असल्याने रात्री उशिरापर्यंत येथे गर्दी असते. अतिक्रमण विभागाच्या माहितीनुसार येथे ५४ अधिकृत व्यावसायिक आहेत, ते रस्त्यावर अतिक्रमण करतात यामुळे दीड वर्षापूर्वी अनेक गाळे सील करण्यात आले होते.

त्यावेळी सारसबागेच्या चौपाटीच्या पुनर्रचनेचा विषय समोर आला. त्यानंतर वास्तूविशारदांकडून यासंदर्भातील आराखडे मागविण्यात आले. त्यातील एका आराखड्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. यासाठी सुमारे ८ कोटी रुपयांचा खर्च येणार होता. मात्र, अचानक या आराखड्याचे काम थांबविण्याचे सूचना करण्यात आली व नव्याने काही आराखडे सादर येणार असल्याचे सांगण्यात आले.

यामध्ये प्रशासनाने सारसबाग चौपाटीचा रस्ता वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करून तेथे दोन मजली जाळे काढण्यात येणार आहेत. तळमजल्यावर ५४ तर पहिल्या मजल्यावर २४ गाळे असणार आहेत. या ठिकाणी खाऊ गल्ली विकसित करताना आकर्षक रंगरंगोटी, विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

तसेच येथे भूमिगत २०० वाहनांसाठी वाहनतळ केले जाणार आहे. सारसबाग चौपाटी येथील रस्ता बंद केला जाणार असल्याने त्यासाठी विकास आराखड्यात आवश्‍यक ते बदल केला जाईल, आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

असा असेल आराखडा

- सारसबागेचा आराखडा तयार करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी केली गुडगाव येथील खाऊ गल्लीची पाहणी

- त्यानंतर तयार केलेल्या आराखड्यात ७८ गाळ्यांचा समावेश

- सध्याच्या ५४ व्यावसायिकांचे पुनर्वसन केल्यानंतर उर्वरित गाळ्यांचा लिलाव होणार

- तळमजल्यावरील गाळ्याचा आकार १.८बाय २.४ मिटर असणार

- पहिल्या मजल्यावरील गाळे ३.७५ बाय ३ मीटर या आकारात असणार

- ग्राहकांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था

- गाळ्यांच्या वर सोलार पॅनेल लावले जाणार

- भूमिगत पार्किंगसाठी दोन्ही बाजूने प्रवेशद्वार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT