Manoj Jarange Sakal
पुणे

Manoj Jarange : न्यायालयाकडून मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्धचे वॉरंट रद्द, यापुढील सुनावणीला उपस्थित राहण्याची अट

वॉरंट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार, न्यायालयाने त्यांना ५०० रुपयांचा दंड करून यापुढील सुनावणीला उपस्थित राहण्याच्या अटींवर त्यांच्याविरुद्धचे वॉरंट रद्द केले.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यासंबंधी बजावण्यात आलेल्या वॉरंट रद्द करण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी न्यायालयात हजेरी लावली.

वॉरंट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार, न्यायालयाने त्यांना ५०० रुपयांचा दंड करून यापुढील सुनावणीला उपस्थित राहण्याच्या अटींवर त्यांच्याविरुद्धचे वॉरंट रद्द केले. जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात फसवणूक व अपहार केल्याच्या आरोपावरून कलम १५६ (३) नुसार त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कोथरूड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी धनंजय जयसिंग घोरपडे (रा. वारजे, कोथरूड) यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणासंबंधी न्यायालयात हजर राहण्यासाठी जरांगे पाटील शुक्रवारी पुण्यात आले होते. सकाळी साडे अकरा वाजता ते न्यायालयात हजर झाले.

त्यांनी वॉरंट रद्द करण्याची विनंती केली होती. न्यायालयाने त्यांना ५०० रुपयांचा दंड आणि यापुढील सुनावणीला नियमितपणे हजेरी लावण्याच्या अटीवर त्यांच्याविरुद्धचे वॉरंट रद्द केले. याविषयी सरकारी वकील ऍड.निलीमा इथापे म्हणाल्या, " न्यायालयाने मनोज जरांगे यांना अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते.

त्यानुसार, जरांगे पाटील न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने त्यांना ५०० रुपयांचा दंड केला आहे. तसेच यापुढील सुनावणीला वेळोवेळी हजर राहण्याच्या अटीवर वॉरंट रद्द केला आहे.'

काय आहे नेमके प्रकरण

फिर्यादी धनंजय घोरपडे हे नाटककार व नाट्य निर्माते आहेत. त्यांनी "शंभूराजे' नावाच्या नाटकाची निर्मिती केली होती. जरांगे पाटील व त्यांच्यासमवेतच्या अन्य दोघांनी घोरपडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी जालना येथे सहा प्रयोग करण्याची त्यांनी विनंती केली होती. प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे ३० लाख रुपये देशमुख यांना द्यायचा करारनामा झाला होता.

२०१३ मध्ये एका महिन्यात सहा प्रयोग झाले. मात्र, या प्रयोगांचे पूर्ण पैसे फिर्यादीला देण्यात आले नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी दाखल तक्रारीनुसार न्यायालयाने पोलिसांना कलम १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले होते.

त्यावरुन कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने यापूर्वी जरांगे पाटील यांना दोनदा समन्स पाठविले होते, मात्र आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. हे वॉरंट रद्द करण्यासाठी जरांगे पाटील शुक्रवारी न्यायालयात हजर झाले होते.

"कायद्याचा सन्मान राखणे आपले कर्तव्य आहे, त्यामुळे मी आज न्यायालयात आलो आहे. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावर बोलता येणार नाही.'

- मनोज जरांगे पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT