पुणे

सांगोल्यत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे शासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून दोन दिवसीय आंदोलन

CD

SGW26B10270
सांगोला : सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी काळ्या फिती लावून आंदोलन करताना तालुका न्यायालयातील कर्मचारी.

सुधारित वेतनश्रेणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन
५ नोव्हेंबरला सामूहिक रजा; १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. १८ : सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी सांगोला तालुका न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी व शनिवारी (१६ व १७ ऑक्टोबर) काळ्या फिती लावून कामकाज केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीने जानेवारी २०२५ मध्ये सुधारित वेतनश्रेणीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र, शासनाने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे चारही न्यायालयीन कर्मचारी महासंघांनी आंदोलनाची घोषणा केली होती. यापूर्वी १७ सप्टेंबरला कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले होते.
मागणी मान्य न झाल्यास ५ नोव्हेंबरला राज्यातील न्यायालयीन कर्मचारी सामूहिक रजा घेणार असून, १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे सांगोला तालुका प्रतिनिधी अभिषेक फुले यांनी दिला. या आंदोलनात ए. एस. बमनाळी, एस. आर. चोपडे, एस. एस. कोळेकर, एम. एम. विठ्ठलदास, एस. व्ही. पाटील, डी. व्ही. सावंत, डी. बी. पाटील यांच्यासह तालुका न्यायालयातील कर्मचारी सहभागी झाले. आंदोलनाला न्यायाधीश संघटना तसेच महाराष्ट्रातील बार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Majalgaon Telgaon Road Accident : माजलगावजवळ एसटी बस आणि कारची भीषण धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू, तुळजापूरला देवीच्या दर्शनला निघाले पण...

Kolhapur Mangav Murder Case : मंदिरातून परतताना अल्पवयीन मुलगीचा धारदार शस्त्राने खून, कोल्हापुरातील माणगाव धक्कादायक घटना; आरोपीचा अद्यापही शोध नाही

Gokul Election Controversy : गोकुळच्या निवडणुकीत अंधश्रद्धेला खतपाणी? बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक होतो!; के. पी. पाटलांच्या विधानाने खळबळ

राखी सावंतच्या अडचणीत वाढ; १६ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट, अभिनेत्रीमुळे गेलेला एकाचा जीव

Latest Marathi News Live Update : दक्षिण चेन्नईतील अनेक निवासी भागांत मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले

SCROLL FOR NEXT