पुणे

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात उद्या भाकपचे रामलीला मैदानावर आंदोलन

CD

केंद्र सरकारविरोधात
उद्या भाकपचे आंदोलन

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ३० : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात रामलीला मैदानावर मंगळवारी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून रविवारी देण्यात आली. विविध क्षेत्रात मोठी संकटे निर्माण झालेली असूनही त्याकडे लक्ष देण्यास सरकार तयार नाही. या पार्श्वभूमीवर ‘बदल आवश्यक आहे’ हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवत आंदोलन केले जाणार असल्याचे पक्षाचे वरिष्ठ नेते डी. राजा यांनी सांगितले.
सरकारच्या धोरणांविरोधात सहा ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशाच्या विविध भागांत मोहीम हाती घेण्यात आली होती. त्या मोहिमेची सांगता रामलीला मैदानावर होईल. वाढती महागाई, बेरोजगारी, धार्मिक विद्वेष याविरोधात आवाज उठवला जाईलच, पण सार्वजनिक शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राची दुरवस्था, प्रलंबित ठेवण्यात आलेले महिलांचे आरक्षण, निवडणुकांमधील गडबड-गैरव्यवहार, दलित तसेच आदिवासींवरील अत्याचार याकडे सरकारचे लक्ष वेधले जाणार असल्याचे राजा यांनी नमूद केले. डाव्या पक्षाचे कार्यकर्ते आंदोलनासाठी दिल्लीपर्यंत पोहोचू नयेत, यासाठी सत्ताधारी पक्षाचे लोक काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आंदोलनासाठी केरळ आणि तमिळनाडूतून येणाऱ्या लोकांच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याचे सांगत राजा म्हणाले, ‘‘देशाला राजकीय परिवर्तनाची गरज असून लोकांना हे परिवर्तन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जनता, लोकशाही, घटनेची जपणूक तसेच सामाजिक न्यायासाठी असे आंदोलन काळाची गरज आहे.’’ दरम्यान राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अशा सर्व स्तरावर हे सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप रॅलीचे समन्वयक पी. संतोष कुमार यांनी केला आहे. देशातील तणाव वाढला असून लोकांची क्रयक्षमता कमी झाली आहे. गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण राहिलेले नाही तर देशातील पैसा विदेशात जात आहे. सामान्य लोक शिक्षण, रोजगार, आरोग्य अशा मूलभूत गोष्टींसाठी झगडत आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Maintenance : कर्मचाऱ्यांना झटका ! पत्नीला पोटगी दिली नाही तर थेट पगारातून कपात; सरकारचा मोठा निर्णय

Junnar Tourism : किल्ले शिवनेरीसह जुन्नर तालुक्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी; हॉटेल व्यवसाय, रोजगाराला चालना

Eknath Shinde Parbhani : परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा अन्... नेमकं काय घडलं?

Bhimashankar Route: घोडेगाव-भीमाशंकर रस्ता खड्डेमय, अंगणवाडी पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाची चौकशी करा : सुप्रिया सुळे

Marathi News Live Updates : उत्तर सायप्रसजवळ २७० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली

SCROLL FOR NEXT