Crime Sakal
पुणे

Crime : पुण्यातील धक्कादायक घटना! भावाकडून सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार; 14 वर्षांची बहीण बनली आई

ही धक्कादायक घटना पुण्यातील वानवडी भागांत घडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून सख्ख्या भावाकडून बहिणीवर आत्याचार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. घरात राहणाऱ्या २४ वर्षाच्या भावाने आपल्या लहान असलेल्या १४ वर्षांच्या सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केले. यातून सदर मुलगी गर्भवती राहिली आणि तिला बाळ झाले आहे. या प्रकारानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अधिक माहितीनुसार, ही घटना पुण्यातील वानवडी परिसरामध्ये घडली असून सदर कुटुंब हे मूळचे कर्नाटक येथील आहे. कुटुंबातील महिला धुणे भांड्याची कामे करते तर पती आणि मुलगा वॉचमन म्हणून काम करतात. महिलेची मुलगी शाळेत जाते. आई आणि वडील कामावर गेल्यानंतर आरोपी भाऊ घरी कुणी नसल्याचा फायदा घेत लहान बहिणीवर अत्याचार करत होता.

मागच्या साधारण एका वर्षापासून हा प्रकार सुरू होता पण बहिणीने ही गोष्ट कुणाला सांगितली नाही. लैंगिक आत्याचारात ती गर्भवती राहिली. तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला दवाखान्यात नेण्यात आल्यावर ती गर्भवती असल्याचं डॉक्टांनी सांगितलं. काही वेळातच तिला प्रसुतीच्या कळा येऊ लागल्या आणि तिने एका बाळाला जन्म दिला.

सदर घटना घडल्यानंतर आईने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार वानवडी पोलिसांनी २४ वर्षांच्या क्रूर भावावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 50,000 चे झाले तब्बल 7 लाख! 1320% रिटर्न देणाऱ्या शेअरची जोरदार चर्चा; 3 आठवड्यांत पैसा डबल

Vaibhav Sooryavanshi चा खेळ पाहण्यासाठी अजित आगरकर चेन्नईत पोहोचणार! KL Rahul ची माघार, हा सामना कुठे रंगणार, Live कुठे?

हिमालाय वितळण्याचं कारण मानवी मूत्र, दरवर्षी २५०० टन बर्फाचं होतंय पाणी; धक्कादायक माहिती समोर

Marathi News Live Updates: जेडब्ल्यू मॅरियट आणि शेराटन हॉटेलविरुद्ध पुणे पोलिसांची कारवाई

Teachers Day 2026: आयुष्यभराची २५ लाखांची कमाई मुलांच्या शिक्षणासाठी खर्चली; शिक्षकाने उभारली वंचितांसाठी शाळा!

SCROLL FOR NEXT