crime pune
crime pune esakal
पुणे

Crime Pune: पुणे हादरले! २४ तासात ३ बलात्कार, एका अल्पवयीन मुलीचा समावेश

रुपेश नामदास

पुण्यात धक्कादाय घटना समोर आल्या आहेत. मागील ४८ तासांमध्ये तीन बलात्काराच्या तक्रारी पोलिसात दाखल करण्यात आल्या आहेत. या घटनांमुळे पुणे हदरून गेलं आहे. शहरातील कात्रज भागात एका डॉक्टरने रुग्ण महिलेवर अत्याचार केला असून पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेतलं आहे.

रुग्ण महिला तपासणीसाठी गेली होती. याच वेळी तिची ओळख डॉक्टरशी झाली. महिलेचा मोबाईल क्रमांक डॉक्टरने घेतला. त्यानंतर आरोपीने महिलेला पुन्हा रुग्णालयात बोलावले आणि धमकावून बलात्कार केला. या प्रकरणातील आरोपी डॉक्टरला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

तर येरवड्यातील फुलेनगर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेला धमकावून तिच्यावर एका तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत. याबाबत एका ३० वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

या दोन घटनानंतर अणखी एक धक्कादायक घटना म्हणजे सहावीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या लगत असलेल्या कोरेगाव भीमा येथील एक १४ वर्षीय मुलगी गरोदर राहिल्या नंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेच्या नातेवाइकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सहावीत शिकणाऱ्या बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी ही गरोदर राहिली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात पोस्को आणि बालात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार पीडित मुलगी ही कोरेगाव भीमा येथे राहण्यास आहे. ती शिक्षण घेत आहे. काल तिच्या पोटात दुखत असल्याने तिच्या आईंने तिला दवाखण्यात नेले. यावेळी डॉक्टरांनी मुलगी गरोदर असल्याचे सांगितल्याने तिची आईच्या पाया खालची जमीन हदरली.

मुलील विश्वासात घेवून विचारना केली असता तिने तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. पीडित मुलीच्या घराशेजारी राहत असलेल्या एका तरूणाने तिला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. यातून ती गर्भवती राहली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT