तीन लाख शेतकऱ्यांनी विम्यापोटी भरले ६६ कोटी रुपये
खरीप पीक विमा : जिल्ह्यातील २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १६ : यंदाच्या खरीपातील आठ पिकांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३ लाख ३२ हजार ६७० अर्जांद्वारे पीक विम्यापोटी ६६ कोटी ४० लाख रुपये भरले आहेत. जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार ५४६ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी २ लाख ४१ हजार ८०६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. पेरणी क्षेत्राच्या तुलनेत विमा संरक्षित क्षेत्राचे प्रमाण ६२ टक्के असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.
पीकनिहाय आकडेवारीनुसार, सोयाबीन पिकासाठी सर्वाधिक ९४ हजार ४८७ अर्ज प्राप्त झाले आहेत. या पिकाचे १ लाख ३४ हजार ३१९ हेक्टर पेरणी क्षेत्र असून, त्यापैकी ८७ हजार १९५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. पेरणी क्षेत्राच्या तुलनेत विमा संरक्षित क्षेत्राचे प्रमाण ६५ टक्के आहे. सोयाबीनसाठी ४०.४६ कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे. तूर पिकासाठी ७८ हजार ४१६ अर्ज प्राप्त झाले असून, ७६ हजार ४२६ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ५९ हजार ९४५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. या पिकाच्या विमा संरक्षित क्षेत्राचे प्रमाण ७८ टक्के असून, एकूण विमा हप्ता २.५२ कोटी रुपये आहे.
मका पिकासाठी ५२ हजार ५१४ अर्ज प्राप्त झाले आहेत. ८२ हजार ८०५ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ३३ हजार १०४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले असून, त्याचे प्रमाण ४० टक्के आहे. या पिकासाठी ०.३३ कोटी रुपयांचा विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे. उडीद पिकासाठी ३२ हजार ४५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. ४० हजार २६७ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी २० हजार ४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले असून, त्याचे प्रमाण ५० टक्के आहे. या पिकासाठी १.०८ कोटी रुपयांचा विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे.
मूग पिकासाठी ७ हजार ५३५ अर्ज प्राप्त झाले असून, ५ हजार ३४३ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ३ हजार ८०६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. या पिकाच्या विमा संरक्षित क्षेत्राचे प्रमाण ७१ टक्के असून, विमा हप्ता ०.५१ कोटी रुपये आहे. भुईमूग पिकासाठी १ हजार ८३९ अर्ज प्राप्त झाले आहेत. २ हजार ९८८ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १ हजार २७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले असून, त्याचे प्रमाण ३४ टक्के आहे. या पिकासाठी ०.२२ कोटी रुपयांचा विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे.
बाजरी पिकासाठी ३८ हजार ६७८ अर्ज प्राप्त झाले असून, १७ हजार ५१९ हेक्टर पेरणी क्षेत्रापेक्षा अधिक म्हणजे २२ हजार ७४२ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित असल्याची नोंद आहे. त्यामुळे विमा संरक्षित क्षेत्राचे प्रमाण १३० टक्के दर्शविण्यात आले आहे. या पिकासाठी ०.३१ कोटी रुपयांचा विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे. कांदा पिकासाठी २६ हजार ७४७ अर्ज प्राप्त झाले असून, ३२ हजार ८७९ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १३ हजार ९८४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. विमा संरक्षित क्षेत्राचे प्रमाण ४३ टक्के असून, या पिकासाठी २०.९८ कोटी रुपयांचा विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.