पुणे

मुळशी : ग्रामपंचायतीचे अर्ज मुहर्तावर भरण्यासाठी गर्दीच गर्दी

राजेंद्र मारणे

भुकूम : मुळशी तालुक्यातील पंचेचाळीस ग्रामपंचयतीचे अर्ज भरण्यास आज दत्त जयंतीच्या मुहर्तामुळे आज मोठी गर्दी झाली होती. गर्दीमुळे पोलिस बंदोबस्त वाढवावा लागला होता. 

तालुक्यातील ग्रामपंचायतीचे उमेदवारी अर्ज कासारअंबोली येथील सैनिक शाळेत स्विकारण्याची सोय करण्यात आली आहे. येथे चारचाकी गाड्यांची मोठी गर्दी झाली होती. सैनिकी शाळेतील  जागा कमी पडू लागल्यामुळे कासारअबोली, सुतारवाडी, शिंदेवाडी परिसरात गाड्या लावल्या होत्या.

या परिसरला मोठ्या यात्रेचे स्वरूप आले होते. तालुक्यातील हिंजवडी, माण, मारूंजी, कासारसाई, जांबे, घोटावडे, भुकूम येथील निवडणूका रंगतदार होणार हे निश्चित आहे. गावामध्ये पँनेल तयार झाले आहेत. 

प्रत्येक पँनेलचे उमेदवार एकत्रित अर्ज भरण्यास येत होते. त्यामुळे गर्दी वाढत होती. महिलांसाठी पन्नास टक्के राखीव जागा असल्यामुळे त्यांची संख्या लक्षणीय होती. अर्ज भरल्यावर फोटो सेशन काही उमेदवार करत होते. 

उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी दुपारी तीन वाजता शेवट आहे.  आँनलाईन अर्ज, दाखले व स्वयंघोषीत पत्रे नोटराईज्ड करण्यासाठी महाईसेवा केंद्रातून ठिकठिकाणी गर्दी होत आहे. त्यातच सरोव्हर डाऊनचा प्रश्न निर्माण होत आहे.  उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे आधिक गर्दी राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT