Cyber Crime esakal
पुणे

Cyber Crime : पुणे शहरात सायबर चोरट्यांचा उच्छाद; एकाच दिवशी फसवणुकीच्या ११ गुन्ह्यांची नोंद

वेगवेगळ्या बहाण्याने नागरिकांची लाखोंची फसवणूक

अनिल सावळे -@AnilSawale

पुणे - कधी एमएनजीएल गॅस, तर कधी एमएसईबीचे थकीत वीज बिल भरण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक केली जात आहे. ऑनलाइन टास्क आणि शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. शहरात सायबर चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, एकाच दिवशी नऊ एप्रिलला फसवणुकीच्या ११ गुन्ह्यांची नोंद झाली. या घटनांवरून नागरिकही पैशांच्या आमिषाला बळी पडत असल्याचे समोर आले आहे.

एमएनजीएलचे बिल भरले ७ लाख ६७ हजार रुपये -

कोथरूडमधील रामबाग कॉलनीतील घटना. एका सोसायटीत ८२ वर्षांचे ज्येष्ठ गृहस्थ राहतात. त्यांना सायबर चोरट्याने मोबाईलवर कॉल केला. बॅंकेतून बोलत असल्याचे भासवून ‘एमएनजीएलचे बिल भरण्यासाठी लिंकवर क्लिक करा,’ असे सांगितले. त्यानंतर क्विक ट्रान्स्फर ॲप, ॲनी डेस्क ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांनी ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर क्रेडिट कार्ड आणि पासवर्डची माहिती घेऊन खात्यातून सात लाख ६७ हजार रुपये काढून घेतले.

यूट्यूबवरील व्हिडिओला लाइक करताय...

कोथरूड परिसरातील गुरू गणेश नगरमधील एका महिलेला अनोळखी व्यक्तीकडून व्हॉटसअप मेसेज आला. यूट्यूबवरील व्हिडिओला लाइक केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवले. आरोपीने महिलेला टेलिग्रामवर लिंक पाठवली. त्यानंतर टास्कच्या बहाण्याने बॅंक खात्यात दोन लाख ९० हजार रुपये भरण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्यानंतर महिलेने पोलिस ठाणे गाठले.

वीज बिलापोटी भरले ११ लाख रुपये -

सिंहगड रस्ता : ‘एमएसईबीचे थकीत बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्यात येईल. त्यामुळे बिल भरून टाका,’ असा मेसेज हिंगणे खुर्द येथील एका ५९ वर्षीय व्यक्तीला आला. आरोपीने वीज बिलाच्या बहाण्याने डेबिट कार्डची माहिती घेतली. त्यानंतर लिंक पाठवून फिर्यादीच्या बॅंक खात्यातून ११ लाख रुपये काढून घेतले.

- विश्रांतवाडी : शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून टिंगरेनगर येथील महिलेची १५ लाखांची फसवणूक.

- चंदननगर : इन्स्टाग्राम पेजला लाइक केल्यास पैशांचे आमिष दाखवून खराडीतील तरुणीची तीन लाख ७१ हजारांची फसवणूक.

- चंदननगर : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या बहाण्याने वडगावशेरीतील तीन महिलांची २८ लाखांची फसवणूक.

- वानवडी : ऑनलाइन टास्कचे आमिष दाखवून हांडेवाडीतील तरुणाची पाच लाखांची फसवणूक.

- कोंढवा : व्हिडिओला लाइक केल्यास पैशांचे आमिष दाखवून शिवनेरीनगरमधील व्यक्तीची पावणेदोन लाखांची फसवणूक.

- कोंढवा : शेअर मार्केटमध्ये चांगला परताव्याच्या आमिषाने उंड्रीतील तरुणाला दहा लाखांना गंडा.

- कोंढवा : शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा देण्याच्या आमिषाने एनआयबीएममधील तरुणाची सव्वादोन लाखांची फसवणूक.

- हडपसर : ‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष दाखवून ससाणेनगरमधील महिलेची पावणेपाच लाख रुपयांची फसवणूक.

हेल्पलाइन क्रमांक १९३०

सायबर पोलिस ठाणे क्रमांक ७०५८७१९३७१

अशी घ्या खबरदारी

- एमएसईबी, एमएनजीएलच्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नका. अधिकृत संकेतस्थळावरून बिल भरा.

- अनोळखी व्यक्तीकडून आलेला क्यूआर कोड स्कॅन करू नका.

- पैशांच्या आमिषाला बळी पडू नका

- शेअर मार्केटमधील ओळखीच्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संपर्क साधून

व्यवहार करा.

- क्रेडिट, डेबिट कार्ड क्रमांक, पासवर्ड आणि ओटीपी शेअर करू नका.

- फसवणूक झाल्यास सायबर किंवा नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : पुणे -मुंबई जुना महामार्गावर वंचित कडून रास्ता रोको

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT