पुणे

पवारांच्या मित्राकडून मोदींचे कौतुक

सम्राट कदम

पुणे : ''जगभरात कोरोनाची लस स्वस्तात पुरविणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे आज सर्वच जण कौतुक करत आहे. पण तुम्हाला कल्पना नसेल ५० वर्षांपूर्वी सिरमची स्थापना होताना तिच्या नावापासून ते विविध परवाना काढेपर्यंत नोकरशाहीने खूप त्रास दिला, असा खुलासा सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पुनवाला यांनी केला.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना ते बोलत होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्याला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक उपस्थित होते.

पुनवाला म्हणाले,"हाफकिन इन्स्टिट्यूट च्या तेंव्हाच्या संचालकांनी सिरमच्या नावाबद्दल आक्षेप घेतला होता. पण आम्ही पार्टनरशिप फर्म असल्याने आमचे नाव मान्य करण्यात आले. जमीन, वीज, पाणी अशा छोट्यामोठ्या गोष्टींसाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. माझ्या परिवारासह सिरमचे संचालक मंडळ, कर्मचारी, अधिकारी आणि शास्त्रज्ञ यांनी हा संघर्षमय खडतर प्रवास पूर्ण केला. आज मात्र आम्हाला सर्वांकडून कौतुकाची थाप मिळत आहे." आज जरी सिरम अब्जाधीश असली तरी जगात सर्वात स्वस्त लस आम्ही पुरवतो, आदर पुनावाला हि परंपरा कायम ठेवेल असा विश्वास, सायरस पुनावाला यांनी व्यक्त केला.

लायसनिंगराज त्रासदायक होते :

मोदींच्या काळात ब्युरोक्रॅट्सचा त्रास झाला नाही म्हणून लस लवकर मिळत आहे. देशातील लायसनिंग राजमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. आता हे प्रमाण काहीसे कमी झाल्यामुळेच आम्ही कोव्हिशिल्डचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले. कोविशिल्डला परवानगी मिळण्याच्या आधीच आम्ही काही कोटी डोस तयार करण्याची रिस्क घेतली. त्यांना जर वेळेवर परवानगी नाही मिळाली तर कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक वाया गेली असती. आमच्या कुटुंबाने लस स्वस्त देऊन त्याग केला. माझ्या उत्पन्नात खुप भर पडली असती पण आम्ही खुप कमी किंमतीत लस दिली आहे. आज मी जरी अब्जाधीश असलो तरी सर्वात स्वस्त लस आम्ही पुरवतो आणि माझा मुलगा आदर पुनावाला ही परंपरा कायम ठेवेल असा मला विश्वास आहे, असे सायरस पुनावाला यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT