Damage 8 to 10 cars in Kondhwa fire 
पुणे

मध्यरात्री कोंढव्यात आग लागल्याची खबर अग्निशामक दलाला मिळाली अन्..

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोंढवा येथील गोडाऊनला बुधवारी मध्यरात्री आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत कारच्या गैरेजधील 8 ते 10 कार जलुन खाक झाल्या, त्याचबरोबर फिशटैंकसाठी लागणाऱ्या काचेच्या महागडया वस्तुंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोंढवा येथील कौसरबागेजवळ असलेल्या वेलकम हॉल चौकामध्ये कार गैरेज, फिशटैंकसाठी लागणाऱ्या काचेच्या वस्तु विक्रीची तीन गोडाऊन आहेत.तिन्ही गोडाऊन एकमेकांच्या शेजारी आहेत. बुधवारी रात्री पावणे बारा वाजता संबंधित गोडाऊनमध्ये आग लागल्याची खबर अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर कोंढवा बुदृक व कोंढवा खुर्द येथील अग्निशामक गाड्या घटनेच्या ठिकाणी गेल्या. मात्र अग्निशामक दलाच्या गाड्या। पोचण्यापूर्वीच आग वाढली होती.

आगीचे प्रमाण जास्त असल्याने लोहियानगर येथील मुख्य अग्निशामक केंद्र, नायडु अग्निशामक केंद्र येथील 4 अग्निशामक गाड्या, 3 पाण्याचे बंब, 3 देवदूत तत्काळ घटनास्थली रवाना झाले. अग्निशामक दलाच्या 25 ते 30 जवानानी एक तास आगीवर पाण्याचा मारा करुन आग विझविली.

आगीमध्ये दोन गैरेजधील 8 ते 10 कार जलाल्या. तर फिशटैंकसाठी लागणाऱ्या काचेच्या महागडया वस्तुंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, असे अग्निशामक अधिकारी समीर शेख यांनी सांगितले.  आग नेमकी कशामुळे लागली हे समजु शकले नाही, दुकानाचे मालक रात्री उशिरा घटनास्थली आले, त्यांनाही किती नुकसान झाले हे समजु शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले ! मशि‍दीजवळ स्फोटात १५ ठार, ५० हून अधिक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

३ महिलांनी बनवली फिल्म, ६०-६० लाखांच्या बजेटपासून तब्बल ३०० कोटींची कमाई; अवघ्या ४१ दिवसांत 'या' सिनेमाने रचला मोठा विक्रम

Garlic for High Cholesterol : सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल कमी होते का? NCBI संशोधनातून काय समोर आले?

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

SCROLL FOR NEXT