Daund Police Station Sakal
पुणे

Daund Crime : गोहत्या करणाऱ्या टोळीवर तडीपारीची कारवाई

दौंड शहर व परिसरात गोहत्या करून गोमांसाची वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीतील सात सदस्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली.

प्रफुल्ल भंडारी

दौंड शहर व परिसरात गोहत्या करून गोमांसाची वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीतील सात सदस्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली.

दौंड - दौंड शहर व परिसरात गोहत्या करून गोमांसाची वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीतील सात सदस्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक अंकित गोयल यांनी ही कारवाई केली आहे.

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी या बाबत माहिती दिली. अधीक्षक अंकित गोयल यांनी दौंड पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार टोळीचा म्होरक्या अश्पाक उर्फ लाला कासम कुरेशी (वय ४२) याच्यासह आसिफ कासम कुरेशी (वय ४१), वाजीद सादिक कुरेशी (वय २८), कय्युम शब्बीर कुरेशी (वय ३५), बाब्या उर्फ इमरान इब्राहिम कुरेशी (वय ३५), इद्रिस आबिद कुरेशी (वय ४०) व तन्वीर ईस्माईल कुरेशी (वय २३, सर्व रा. कुरेशी मोहल्ला, खाटीक गल्ली, दौंड) यांना ६ मे २०२३ पासून एका वर्षाकरिता तडीपार केले आहे.

पुणे शहर पोलिस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलिस हद्दीसह नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कर्जत तालुका हद्दीतून टोळीला तडीपार करण्यात आले आहे.

टोळीकडून गोहत्या, गोवंश हत्या करून मांसाची वाहतूक आणि विक्री सातत्याने केली जात होती. पोलिसांना संशय येऊ नये, याकरिता टोळीकडून गोमांस वाहतुकीसाठी स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) वाहनांचा वापर केला जात होता.

अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उप अधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भाऊसाहेब पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, उप निरीक्षक सतिश राऊत, हवालदार महेश बनकर, पोलिस नाईक शरद वारे, कॉन्स्टेबल सागर गलांडे व योगेश गोलांडे यांनी ही कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT