पुणे

दौंडमध्ये आज, उद्या पाणीपुरवठा बंद

CD

दौंड, ता. २१ : जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे दौंड शहराचा पाणीपुरवठा शुक्रवार (ता. २३) आणि शनिवार (ता. २४) असे सलग दोन दिवस बंद राहणार आहे. दुरुस्तीनंतर रविवारी (ता. २५) पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार असला, तरी तो उशिरा आणि कमी दाबाने होईल, अशी माहिती दौंड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अधिकारी मल्लिकार्जुन बनसोडे यांनी दिली.
दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातून जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. ही गळती रोखण्यासाठी प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी शहराला पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्ती कामांमुळे ट्रॅक्टर- टॅंकरने केला जाणारा पाणीपुरवठा देखील बंद ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
दौंड शहरात मागील ११ वर्षांपासून दिवसाआड केवळ एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. नगरपालिकेने दिलेल्या अधिकृत नळजोडांची संख्या ८६७६ इतकी असून, पाणीचोरी व पाणीगळतीचे प्रमाण १५ टक्के इतके आहे. कमी दाबाने होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे जलजन्य आजारांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे जार दररोज विकत घ्यावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT