पुणे

'डे केअर' संस्थांची उलाढाल दोन कोटींच्या घरात

शिवानी खोरगडे

पुणे : शहरात पाळीव प्राण्यांची संख्या वाढत आहे. मात्र, त्यांचा सांभाळ करण्यासाठी मालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नेमकी हीच गरज ओळखून "पेट डे केअर संस्था' उभ्या राहिल्या आहेत. सध्या या क्षेत्रातील वार्षिक उलाढाल दोन ते अडीच कोटींच्या घरात जाऊन पोचली आहे. 

अनेक कुटुंबीयांमध्ये पाळीव प्राणी हे घरातील सदस्यांप्रमाणे असतात. घरातील वडीलधारे बाहेर जाताना दिसले की घरातील लहानगे त्यांच्याबरोबर जाण्याचा आग्रह धरतात. तसेच प्राण्यांचेही असते. कुटुंबीयांपैकी कोणी बाहेर जात असल्यास प्राण्यांना त्याची लगेच जाणीव होते व ते मागे मागे येतात. त्यासाठी कुणालातरी त्यांची काळजी घेण्यासाठी घरी थांबावेच लागते.

अनेकांची इच्छा असूनही दिवसभरातील कामाच्या व्यग्रतेमुळे प्राण्यांची काळजी घ्यायला जमत नाही. यावर उपाय म्हणून प्राणी डे केअर संस्था उभ्या राहिल्या आहेत. या संस्थांवर आपल्या लाडक्‍या प्राण्यांची जबाबदारी सोपवून आपण निर्धास्त फिरू शकतो, काम करू शकतो. या सोयीमुळे लोकांना पाळीव प्राणी पाळणे सोपे झाले आहे. 

प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक

या संस्थांकडून पाचशे ते हजार रुपये प्रति दिवस एवढे पैसे आकारले जातात. त्यात दिवसभरातील जेवण, स्वच्छता, फिरवणे आदी सोयी पुरविल्या जातात.

प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचीच डे केअरमध्ये नेमणूक केलेली असते. प्राण्याला काही इजा किंवा आजार झाल्यास औषधोपचारासाठी डॉक्‍टरही उपलब्ध असतात. प्राण्यांचे मूड किंवा लाड पुरविण्यासाठी या संस्थाची मदत होत असते, असे अनुभव प्राण्यांच्या मालकांनी सांगितले. 

बाहेरगावी जायचे असल्यास किंवा कामात असल्यास प्राण्यांना कोठे ठेवायचे, याचे सर्वात सोपे उत्तर म्हणजे डे केअर. या क्षेत्रात मी वीस वर्षे असून, दरवर्षी या क्षेत्राचा विस्तार होत गेला आहे. या क्षेत्रात अनेकांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. 

- डॉ. विनय गोऱ्हे, मालक, पेट कव्हर अँन्ड पेट क्‍लिनिक 

पेट डे केअर क्षेत्रात व्यावसायिकता येत आहे. लोक ते स्वीकारत आहेत, कारण आपले प्राणी आपल्या मागे विना त्रासात, खेळीमेळीच्या वातावरणात राहतील अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे हे सांस्कृतिक परिवर्तन आहे. 

- पल्लवी शेवडे, पाळीव प्राण्यांचे मालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP woman leader daughter in law : भाजप महिला नेत्याच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल; अंतर्वस्त्रांमध्ये सापडली चिठ्ठी, विवाहबाह्य संबंधांचा आरोप

लता मंगेशकरांचं ते अजरामर गाणं, जे गाताना डोळ्यात आले होते अश्रू; 67 वर्षांनंतरही रक्षाबंधनाला प्रत्येक भाऊ-बहिणीला करतं भावुक!

Ramdas Athawale at Kamathipura : सोलापूर, कर्नाटक ते बंगाल... कामाठीपुऱ्यातील महिलांचं दु:ख जाणून घेत आठवलेंनी साजरा केलं रक्षाबंधन; मुख्य प्रवाहात आणण्याचंही दिलं आश्वासन

Marathi News Live Updates : RSS पथसंचलनात सहभागी झाल्याने दोन शिक्षक निलंबित; एच. डी. कुमारस्वामींचा सरकारला सवाल

Grand Chess Tour: प्रज्ञानंद ठरला 'किंग'! अमेरिकेच्या खेळाडूला धूळ चारत घडवला इतिहास; कोट्यवधींचे बक्षीसीही मिळाले

SCROLL FOR NEXT