Pune Flood:  sakal
पुणे

Pune Flood: पावसात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर मिळाला

Pune Latest Update: डेंगळेपूल कुंभार वाडा व संगम ब्रिजच्या येथे तरुणाचा मृतदेह आढळून आला.

सकाळ वृत्तसेवा

Katraj: मुसळधार पावसामुळे परिसरातील ओढ्यांना व नाल्यांना पूर आला आहे. कात्रज येथील लेकटाऊन सोसायटीशेजारी असणाऱ्या आंबील ओढ्यात मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण ड्रेनेज लाईनमधून वाहून गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. २५) दुपारच्या सुमारास घटना घडली होती.

भारती विद्यापीठ पोलिसासह कात्रज, गंगाधाम, जनता वसाहत व कसबा अग्निशामक दलाच्या जवानांकडून सदरील तरुणाचे शोध कार्य सुरू होते. अग्निशमन जवानांनी जवळपास दहा ते बारा चेंबर शोधले. अखेर डेंगळेपूल कुंभार वाडा व संगम ब्रिजच्या येथे तरुणाचा मृतदेह आढळून आला असून मृतदेह पुढील तपासणी साठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

अक्षय संदेश साळुंखे वय २६ राहणार शिवमुद्रा चाळ अप्पर असे तरुणाचे नाव आहे. आंबील ओढ्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ही दुर्घटना घडली होती. कात्रज, गंगाधाम, जनता वसाहत,कसबा अग्निशमन दलाकडून सदरील तरुणाचा शोध घेण्यात आला. अग्निशमन अधिकारी सुनील नाईकनवरे, कात्रज अग्निशामक दलाचे प्रमुख प्रदीप खेडेकर, सुभाष जाधव, तांडेल भरत भारती, भरत वाडकर, फायरमन तेजस मांडवकर, अनिकत पवार, अविनाश जाधव, प्रतीक शिर्के, रोहित जाधव आदीसह दहा ते बारा जवानांनी शोधकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT