Deadline for admission health science degree courses pune  Sakal
पुणे

पुणे : आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम मुदत जाहीर

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत एमबीबीएस अभ्यासक्रमांसाठी ५ एप्रिल, तर बीडीएस अभ्यासक्रमासाठी ११ एप्रिलपर्यंत प्रवेशाचा अंतिम कालावधी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने जाहीर केला आहे.

वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनथेरपी, ऑडिओ स्पिच लॅग्वेज, प्रोस्थोटिस्क ॲण्ड ऑर्थोटिक्स या आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश हे ‘नीट-युजी २०२१’ या परीक्षेच्या गुणवत्तेच्या आधारे देण्यात येतात. इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम तारीख पाहता नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची अंतिम तारीख वाढविण्याबाबत नवी दिल्लीतील भारतीय नर्सिंग परिषद यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विनंती करण्यात केली होती. परंतु नर्सिंग परिषद यांनी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत असून त्यात बदल करणार नसल्याचे कळविले आहे.

त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शासकीय, खासगी, विनाअनुदानित, अल्पसंख्याक नर्सिंग महाविद्यालयातील रिक्त जागांवरील प्रवेशासाठी रिक्त जागा या संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी संबंधित संस्थांना वर्ग करण्यात येत आहेत. संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया ही २८ ते ३१ मार्च दरम्यान राबविण्यात येत आहे. संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक, उपलब्ध जागांची माहिती, अर्जाचा नमुना राज्य सीईटी कक्षाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी संबंधित उमेदवार, शैक्षणिक संस्था यांनी अधिक माहितीसाठी राज्य सीईटी कक्षाचे ‘www.mahacet.org’ संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन सीईटी सेलतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT