Accident News Esakal
पुणे

Accident News: पंधरा दिवस पंढरीची वारी... घरापासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर अपघात अन् ...

पुणे सोलापूर महामार्गावर ट्रकच्या धडकेत वारकरी महिलेचा मृत्यू

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर एका ६५ वर्षीय वारकरी महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा येथे काल (शुक्रवारी) दुपारी हा अपघात झाला आहे. (Latest Marathi News)

दगडाबाई बाळू खुपसे (६५) असे अपघातात मृत्यू झालेल्या वारकरी महिलेचे नाव आहे. तर नाना सुखदेव कावरे (३५) असे ट्रक चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दगडाबाई आषाढी वारीनिमित्त पायी पंढरपूरला गेल्या होत्या. आज दुपारी तीनच्या आसपासत्या पंढरपूर वरून पुणे - सोलापूर महामार्गावरील थेऊर फाट्यावरून कोलवडीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जात असताना पुण्याच्या दिशेकडून लोणीकंदकडे निघालेल्या एका ट्रकच्या मागील चाकाखाली खुपसे आल्या.(Latest Marathi News)

या अपघातामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तात्काळ लोणी काळभोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेने परिसरात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे. तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर मागील काही दिवसांपासून रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात 5 दिवसांत मोठी घसरण! उच्चांकापासून तब्बल 33 हजारांनी स्वस्त; दसऱ्याआधी पाहा ताजा भाव

Distance Education: राज्यात दूरस्थ शिक्षण घेणारे वाढले ;केंद्रीय उच्चशिक्षण विभागाचा अहवाल

Train Viral Video : वा रे पठ्ठ्या ! थेट ट्रेनच्या एसी डब्यातच थाटले पानाचे दुकान, अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Marathi News Live Updates: मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी, कार्यकर्त्यांकडून सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित

SCROLL FOR NEXT