पुणे

Pune Corona: पुणेकरांना दिलासा; रुग्णसंख्या होतेय कमी

विनायक होगाडे

पुणे शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

पुणे : पुणे शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. पुणेकरांना आता दिलासा मिळत असून रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. मात्र तरीही शहरातील कोरोनाची परिस्थिती अद्याप संपूर्णपणे स्थिरस्थावर झालेली नाहीये. शहरात काल नव्या ६८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती तर आज नव्याने ५८८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ६८ हजार १२९ इतकी झाली आहे. शहरातील ९२१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ५१ हजार ९९१ झाली आहे. (Decline in corona patient numbers Consolation to the people of Pune)

शहरात आज एकाच दिवसात ८ हजार १९३ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २४ लाख ६८ हजार ७०९ इतकी झाली आहे. शहरात उपचार घेणाऱ्या ७ हजार ९९० रुग्णांपैकी ९९६ रुग्ण गंभीर तर १८६२ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार १४८ इतकी झाली आहे.

राज्यात गेल्या 24 तासांत 21 लाख 273 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 34 हजार 370 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 93.02 टक्के झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 425 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर 1.63 टक्के आहे. राज्यात सध्या 3 लाख 01 हजार 041 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यातील 52 लाख 76 हजार 203 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने ( health ministry) यासंदर्भातील माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: विराट कोहलीचा चौकार अन् मोडला राहुल द्रविडच्या नावावरील मोठा विक्रम! इंग्लंडमध्येही ठरला 'किंग'

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

भारतातून OnePlus ची एक्झिट? 2027 पर्यंत कंपनी बंद होणार असल्याची चर्चा; ज्यांच्याकडे आत्ता मोबाईल आहे त्यांनी काय करायचं? वाचा

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडी कायम

Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT