Defamation of Lal Mahal Vikas Pasalkar Organizing dance show tamasha pune Defamation of Lal Mahal Vikas Pasalkar Organizing dance show tamasha pune
पुणे

तमाशातील गाण्यांवर नृत्याचे आयोजन; लाल महालाची बदनामी; विकास पासलकर

पुणे शहरात हजारो पर्यटक जिजाऊ व शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लाल महालात तमाशातील गाण्यांवर लहान मुलींचे नृत्याचे आयोजन करून लाल महाल बदनाम केला जात आहे. ही बदनामी करणाऱ्यांवर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर यांनी केली आहे. महापालिकेने उन्हाळ्याच्या सुटीत लाल महाल बंद ठेवला आहे. पुणे शहरात हजारो पर्यटक जिजाऊ व शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. मात्र पालिका व तेथील सुरक्षा रक्षकांकडून लाल महाल बंद ठेवण्यात आलेला आहे.

मात्र दुसरीकडे याच लाल महालात रिल्स काढण्याच्या नादात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर मुलींच्या नृत्याचे कार्यक्रम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या घाणेरड्या व्हिडिओसंदर्भात तीन दिवसापूर्वी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे संभाजी ब्रिगेडच्यावतीने तक्रार करण्यात आलेली आहे. या घटनेच्या पाठीमागे खूप मोठे षडयंत्र आहे. हे षडयंत्र रचणारे व त्यांना साथ देणारे कोण आहेत, याचा शोध घेतला पाहिजे. या घटनेचा शुक्रवारी (ता.२०) लाल महालात जाऊन निषेध करण्यात आला. यावेळी जिजाऊ व शिवरायांना पुष्पहार अर्पण करून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी अरविंद शिंदे, बाळासाहेब बोडके, प्रशांत धुमाळ, संतोष शिंदे, मंदार बहिरट उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT