neeraj sakal
पुणे

संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते होणार सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचा सत्कार

शुक्रवारी राजनाथ सिंह पुणे दौऱ्यावर आहेत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) उद्या (शुक्रवारी) पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला (एएसआय) भेट देणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारे सुभेदार नीरज चोप्रा (neeraj chopra) यांच्यासह इतर सर्व लष्करी खेळाडूंचा सत्कार त्यांच्या हस्ते होणार आहे.

पुणे दौऱ्यादरम्यान राजनाथ सिंह हे खडकवासला येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी (डीआयएटी) आणि दक्षिण मुख्यालयालाही भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्या सोबत लष्कर प्रमुख जनरल एम.एम नरवणे आणि दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस नैन ही उपस्थित राहणार आहेत. या पूर्वी संरक्षण मंत्री २३ ऑगस्टला पुणे दौऱ्या अंतर्गत या संस्थांना भेट देणार होते.

मेजर ध्यानचंद यांच्यापासून सुभेदार नीरज चोप्रापर्यंत या सर्वांनी क्रिडा क्षेत्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपली नावे कोरली आहेत. यासाठी भारतीय सैन्य देखील अशा खेळाडूंना योग्य संधी देत आहे. ऑलिम्पिकसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळांचे महत्त्व वाढविण्यासाठी आणि देशासाठी जास्तीत जास्त पदके जिंकण्याच्या उद्देशाने भारतीय लष्कराद्वारे २००१ मध्ये ‘मिशन ऑलिंपिक या कार्यक्रमांतर्गत पुण्यातील एएसआयची स्थापना करण्यात आली होती.

या उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी एएसआय ही संस्था तत्पर आहे. या संस्थेने देशाला ३४ ऑलिंपिक खेळाडू, २२ कॉमनवेल्थ पदक विजेते, २१ एशियन गेम पदक विजेते, सहा युथ गेम्स विजेते आणि १३ अर्जुन पुरस्कार विजेते प्रदान केले आहेत. एएसआय ही एक प्रमुख क्रीडा प्रशिक्षण संस्था म्हणून विकसित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

Mumbai: १० वर्षीय मुलीनं १८ महिन्यांच्या बाळाला इमारतीवरून खाली फेकलं, गोरेगावात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Update : मसाल्यांमध्ये रंगांचा वापर चालणार नाही- तुकाराम मुंढे

SCROLL FOR NEXT