nalla.jpg 
पुणे

टेंडर निघालं अन् गोखलेनगर परिसरात नालेसफाई सुरु झाली पण...

समाधान काटे

गोखलेनगर (पुणे) : दिवसेंदिवस नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर येत असून, आता नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत गोखलेनगर, जनवाडी, जनता वसाहत, वडारवाडी आदी परिसर येतो. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणे गरजेचे असताना देखील, वरील परिसरातील नालेसफाई अजून झालेली नाही. यावर्षी नालेसफाईसाठी शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत ५० लाख रूपयांची निविदा काढून संबंधित ठेकेदाराला टेंडर देण्यात आले आहे.

नागरिकांच्या कररूपी पैशातून पालिका प्रशासन ही कामे दरवर्षी करत असते. वेळेपूर्वी नालेसफाई न झाल्याने पावसाळ्यात नाल्यांमध्ये पाणी साठून नागरिकांच्या घरात पाणी शिरते. पालिका प्रशासन मात्र बेजबाबदारपणे वागत असल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही नाले सफाई होत नसल्याने, गोखलेनगर, जनवाडी येथील शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रविण डोंगरे तसेच म्हाळूपार्वती प्रतिष्ठानचे संस्थापक निलेश प्रकाश निकम यांनी निवेदनाद्वारे पालिका प्रशासनास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"मागील अनेक दिवसांपासून गोखलेनगर, जनवाडी येथे नालेसफाईचे काम झाले नाही. तसेच सदर नाल्यांमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात आला आहे. त्यामुळे सदर नाल्यातील घाण सांडपाणी बाहेर येऊन आजूबाजूच्या परिसरात पसरून दुर्गंधी व आजार पसरायची दाट शक्यता आहे. आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव हा जनवाडी, गोखलेनगर भागात वाढत आहे. त्यामुळे नागरिक भयभीत असताना नाल्यांची साफसफाई झाली नाही. व त्यातील सांडपाण्यामुळे व कचऱ्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. नाल्याची लवकर सफाई केला नाही तर सोमवारी तीव्र आंदोलन करणार आहोत"
  - निलेश प्रकाश निकम, संस्थापक अध्यक्ष, म्हाळूपार्वती प्रतिष्ठान

"दरवर्षी ही गटार ( नाला ) पावसाळ्या आधी साफ करतात. परंतु अनेकदा तक्रार करुन देखील नाला साफ झाला नाही. पुणे महापालिका ठेकेदाराचे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे. नाल्याची सफाई वरवर केली जात असून नाल्यात साचलेली घाण नाल्यालगतच टाकली जात आहे. त्यामुळे पाऊस सुरु झाला की सदर घाण परत नाल्यातच जाते त्यामुळे नाला पुन्हा तुंबून नागरिकांच्या घरात घाण पाणी शिरते व त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो. सदर नाला दोन दिवसात साफ न झाल्यास सदर परिसरातील नागरीकांच्या द्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे"
     - प्रविण  डोंगरे, शिवसेना विभाग प्रमुख शिवाजीनगर

"नालेसफाईसाठी शिवाजी नगर- घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत ५० लाख रुपयाचे टेंडर असून, संबंधित ठेकेदार नालेसफाई करत आहे. कंटेनमेंट झोन असल्यामुळे नालेसफाईला वेळ लागत आहे. अजून १० ते १५  दिवस लागतील".
 - नाथा चव्हाण , उपअभियंता महापालिका पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Farmer: अधिकारी फोटो काढून गेले अन्... मदतीचा बैलही निघाला आजारी; लातूरच्या शेतकऱ्याच्या दु:खाला अंतच नाही!

Akola News: मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही बुडून मृत्यू; धार्मिक स्नान ठरले अखेरचे, समशेरपूर येथील घटना!

OnePlus Turbo 6X Pro मोबाईलची धमाकेदार एन्ट्री! चक्क 8000mAh एवढी मोठी बॅटरी; लॉन्च होताच डिस्काउंट, किंमत फक्त...

Latest Marathi News Live Update : अमरनाथ यात्रा सुरक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Sharad Pawar Congress Merger : शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार? काँग्रेस नेत्यांकडून सूचक वक्तव्य; राहुल गांधी, खर्गे निर्णय घेणार

SCROLL FOR NEXT