Pune News sakal
पुणे

Pune News : सहायक पोलिस आयुक्तांसाठी लाच मागणारा अटकेत

पिंपरी-चिंचवडमधील देहूरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्या सांगण्यावरून पाच लाखांची लाच मागत त्यातील एक लाख रुपये लाच स्वीकारल्याप्रकरणी एकास अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील देहूरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्या सांगण्यावरून पाच लाखांची लाच मागत त्यातील एक लाख रुपये लाच स्वीकारल्याप्रकरणी एकास अटक केली आहे. येथील एका खासगी रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा लावून ही कारवाई केली.

ओंकार भरत जाधव (वय ३२, रा. वाकड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या विरुद्ध देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त पाटील यांच्याकडे कात्रज-कोंढवा बायपास रस्त्यावरील एका जागेसंबंधात फसवणुकीचा तक्रार अर्ज दाखल आहे. या तक्रार अर्जाची चौकशी पाटील यांच्याकडे सुरू होती.

त्या तक्रारअर्जामध्ये तक्रारदार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व मदत करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. पाटील यांच्या सूचनेवरून जाधव याने पाच लाख रुपयांची लाच मागितली, असे तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीत नमूद आहे. लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्वीकारताना एसीबीने जाधव याला अटक केली आहे.

या प्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विभागाचे पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव, पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे, सहाय्यक पोलिस फौजदार मुकुंद अयाचित, पोलिस हवालदार चंद्रकांत जाधव, पोलिस शिपाई दिनेश माने यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

SCROLL FOR NEXT